• Thu. Apr 25th, 2024

दयानंद विधी महाविद्यालयाचे दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत: गुणवत्तेची परंपरा कायम

Byjantaadmin

Dec 31, 2022

दयानंद विधी महाविद्यालयाचे दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत: गुणवत्तेची परंपरा कायम

लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयाची प्रियंका देशपांडे विद्यापीठात प्रथम

लातूर :-दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधी महाविद्यालय लातूरच्या दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या गुणवत्ता यादीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यामध्ये एल एल बी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. प्रियंका अशोक देशपांडे (८७.०८%) ही विद्यापीठात सर्वप्रथम असून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. बी.ए. एल.एल. बी पाचव्या वर्षाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी किशोर खंडेलवाल(८७.०८%) विद्यापीठात सर्व द्वितीय असून बीएएलएलबी पाचव्या वर्षाचा आशिष बालाजी कूटवडे (८६.६७%) विद्यापीठात सर्व तृतीय आला आहे. एलएलएम व डिप्लोमा इन ए डी आर या दोन्ही अभ्यासक्रमासाठी दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकाविले आहे. यामध्ये गणेश गुणवंत पाटील (९७.७७%)विद्यापीठात सर्वप्रथम, सोमेश्वर सिद्राम बिराजदार(९७.४६%) आणि दत्तात्रय नारायण इंगळे (९७.४६%) विद्यापीठात सर्व द्वितीय आणि पल्लवी शशिकांत वारद(९७.३१%) विद्यापीठात सर्व तृतीय आले आहेत.
डिप्लोमा इन ए डी आर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान तृप्ती नारायण इटकरी(७६.५०%), सर्व द्वितीय अनिता नंदकिशोर गिरी(७५.२५%), व सर्व तृतीय चैतन्य नारायण इटकरी(७४.००%),यांना मिळाला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितकुमार शहा, रमेश राठी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, ॲड. आशिष बाजपाई दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. पुनम नाथानी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *