• Thu. Apr 25th, 2024

शास्वत विकास आणि मानव कल्याणासाठी मत्स्यशेतीचा उपयोग करावा- जनक भोसले

Byjantaadmin

Dec 31, 2022

शास्वत विकास आणि मानव कल्याणासाठी मत्स्यशेतीचा उपयोग करावा- जनक भोसले

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने मत्स्यशेती संवर्धन या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या पुणे मत्स्य विभागातील सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त मा. जनक भोसले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते म्हणाले की, मत्स्यशेती संवर्धन कौशल्य तंत्रज्ञान व शासनाच्या विविध अनुदानपध्दतींचा सर्वसामान्यांनी लाभ घेऊन शास्वत विकास व बेरोजगारी निर्मूलन करता येते. मत्स्यशेतीच्या माध्यमातून मानवी कल्याण साधता येतो, त्यातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण करता येतात. त्यासाठी अस्तीत्वात असलेल्या शासनाच्या विविध योजना आपल्याला उपयोगी पडतात असेही मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, शासनाच्या मत्स्य विभागात नौकरीच्याही विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात लोकसेवा आयोगामार्फत निर्मित पदे, अभ्यासक्रम व परीक्षा पध्दती विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्यास या विभागात नौकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. माधव कोलपूके हे उपस्थित होते. त्यांनीही यावेळी मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी मत्स्यशेती बहुकौशल्य, जागरूकता व त्या माध्यमातून आपला शास्वत विकास साध्य करण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष, मा. विजय पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थीती होती, तसेच प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. धनंजय जाधव व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थीनी कु. रचना हजारे व कु. प्राजक्ता पांचाळ यांनी केले. तर आभार प्रा. विष्णू रेड्डी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *