• Thu. Apr 25th, 2024

महाराष्ट्र महाविद्यालयात ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

Byjantaadmin

Dec 31, 2022

महाराष्ट्र महाविद्यालयात ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लातूर येथील वैद्यकीय मानसोपचार तज्ञ मा. सरीता शेंडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी याप्रसंगी मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखीत करून ताणतणाव व्यवस्थापनासाठी मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे असे मत प्रतीपादन केले. त्यांनी यावेळी मानवी जीवनात येणाऱ्या ताणतणावाची कारणे विस्ताराने सांगून तो दूर करण्यासाठीचे विविध उपाय सांगीतले त्याचबरोबर ताणतणाव व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यात वेळेचे नियोजन, मित्रपरिवार व सहकारी वर्गात आपण वेळ घालवला पाहिजे, नियमीत व्यायाम, ध्यानधारणा, सकारात्मक विचारशक्ती वाढवली पाहिजे त्यातून आपला ताणतणाव दूर होऊ शकतो असे मत प्रतीपादन केले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. माधव कोलपूके उपस्थित होते. त्यांनीही यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्य जपले पाहिजे त्यासाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहीजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांनी केले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यशाळेसाठी मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते श्री राजाभाऊ घुले, मानसशास्त्रज्ञ श्री किरण कनकुटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. धनंजय जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधीकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सहसमन्वयक डॉ. नरेश पिनमकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री ज्ञानेश्वर खांडेकर, श्री उमाजी तोरकड यांनी श्री सिध्देश्वर कुंभार यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *