• Fri. Apr 19th, 2024

संजय गांधी निराधार योजनेच्या  पात्र लाभार्थींना भेट, ४ कोटी १६  लाख २१ हजार ३०० रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा, अनुदान वाटपास सुरुवात

Byjantaadmin

Sep 30, 2022

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर लातूरातील संजय गांधी निराधार योजनेच्या  पात्र लाभार्थींना भेट,

 कोटी १६  लाख २१ हजार ३०० रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमाअनुदान वाटपास सुरुवात

  लातुर:-  संजय गांधी अनुदान योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात प्रभागनिहाय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात दाखल केलेल्या पात्र लाभार्थीचे अनुदान मंजूर झाले असून ऑगस्ट – २०२२ अखेर पर्यंतच्या अनुदानापोटी बॅंकांमध्ये ४ कोटी १६ लाख २१ हजार ३०० रुपये इतके अनुदान जमा करण्यात आलेले आहे. मंजूर यादीतील सर्व लाभार्थ्यांनी आपापल्या बँकेत जाऊन आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली  अनुदान रक्कम उचलून घ्यावी, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समिती व तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोविड१९ प्रादुर्भाव मार्गदर्शक नियमावलीचे पालन करीत लातूर शहरातील विविध १८ प्रभागात सन २०२१-२२ वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिरे घेण्यात आली होती. या समाधान शिबिरात सहभागी होऊन आवश्यक कागदपत्र पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थीना येणाऱ्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या आवश्यक गरजांची पूर्तता व्हावी, संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियासह दसरा-दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा याकरीता माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून संबंधित विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती लातूर यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून आता या संबंधित सर्व पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

   यामध्ये डिसेंबर व जानेवारी २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी निराधार योजना समिती व प्रशासनास प्राप्त आणि २४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील  ४५९ पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२२ अखेर पर्यंतच्या अनुदानापोटी संबंधित बॅंकांमध्ये ४ कोटी १६ लाख २१ हजार ३०० रुपये इतके अनुदान जमा करण्यात आलेले आहे. मंजूर यादीतील सर्व निराधार लाभार्थ्यांनी आपापल्या बँकेत जाऊन आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली  अनुदान रक्कम उचलून घ्यावी. तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत प्राप्त अर्जांपैकी १७ मे २०२२ रोजीच्या पार पडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या ८१३ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांचेही अनुदान लवकरच संबंधित बँक खात्यावर  जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती लातूर शहर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष हकीम शेख, तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार श्रावण उगले, लातूर शहर संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दगडूआप्पा मिटकरी, भालचंद्र सोनकांबळे, मनोज देशमुख, नरेश कुलकर्णी, बरकत शेख, बंडू सोलंकर, अंजली चिंताले, फारूक तांबोळी, राहुल रोडे, अव्वल कारकून शाहनवाज पठाण, महसूल सहाय्यक शबाना पठाण, सुप्रिया बिराजदार, ऑपरेटर बाळासाहेब जाधव, शेख हसमुख यांच्याकडून एका प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *