• Mon. Oct 2nd, 2023

एक नेता, एक झेंडा, एक मैदान:दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा टिझर

Byjantaadmin

Sep 30, 2022

मुंबई:-शिंदे आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातल्या शक्तिप्रदर्शनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याच्या टिझर प्रदर्शित केले असतानाच आता ठाकरे गटाकडून देखील दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शत करण्यात आला आहे.

काय आहे टिझरमध्ये?

शिवसेनेने ट्विट करत म्हटले आहे की, एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! सेनेकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून, त्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोने सुरूवात करण्यात आली आहे. त्यात लिहले आले आहे की, “निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकत दिसणार” अशा ओळी टिझरमध्ये लिहण्यात आल्या आहेत. त्यानंतर “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो-मातांनो” बाळासाहेबांचे हे उद्गार देखील त्यात करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचा हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे देखील टिझरमध्ये म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *