• Fri. Mar 29th, 2024

एक संघटना, एक विचार, एक मैदान’ राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा

Byjantaadmin

Oct 3, 2022

मुंबई, : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याचा आरोप करून शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला आहे. पण, आता राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. मातोश्रीबाहेर बॅनर लावून पाठिंबा दिला आहे.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला पाठिंबा दिला आहे.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावले आहे.  ‘एक संघटना, एक विचार, एक मैदान… शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या, खूप खूप शुभेच्छा’ अशा प्रकारचे पोस्ट लावून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पाठिंबा दिला आहे.विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसने सुद्धा शिवसेनेला पाठिंबा दर्शवत मातोश्री बाहेर बॅनर लावले होते. आज राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसच्या बाजूलाच बॅनर लावले आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांचे फोटो आहे

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर तयारीला सुरुवात झालेली आहे. मैदानात होणाऱ्या भव्य सभेसाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते, सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटात हे मैदान मिळवण्यावरून झालेलं रणकंदन सर्वांनी पाहिलं आता ठाकरे गटाला परवानगी मिळाल्यानंतर कशा प्रकारे हा दसरा मेळावा पार पडतोय.

याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. तब्बल ५६ वर्ष याच ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आणि यावर्षीसुद्धा शिवसेना मेळाव्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हेसुद्धा पाहण्याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *