• Tue. Apr 23rd, 2024

शिंदे गटाचा आमदार भाजपच्या गळाला?

Byjantaadmin

Oct 3, 2022

भंडारा :  शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये  एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हजेरी लावली आहे. नरेंद्र भोंडेकर हे भंडारा शहरातून अपक्ष आमदार आहे. शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुव्या उंच्यावल्या आहे.या मेळाव्यात नरेंद्र भोंडेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसले आहे. विशेष म्हणजे, भाजप पक्षाचा गमच्छा गळ्यात घालून भोंडेकर मेळाव्यात हजर झाले होते.

यावेळी नरेंद्र भोंडेकर भाषण सुद्धा केलं.  ‘मी देवेंद्र फडणवीस यांना गुरू मानतो. फडणवीस राज्याचेच नाही तर देशाचे नेतृत्वकरण्याची क्षमता आहे. भविष्यात भंडारा नगरपरिषद ही भाजपचे असेल, असा विश्वासही नरेंद्र भोंडकर यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *