• Tue. Apr 23rd, 2024

माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते औटे परिवारास मदतीचा धनादेश

Byjantaadmin

Oct 3, 2022

माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते औटे परिवारास मदतीचा धनादेश

निलंगा/प्रतिनिधी ः- तालुक्यातील लांबोटा येथील उषाबाई औटे यांचा कांही दिवसापुर्वी विज पडून दुर्देवी मृत्यू झाला. या दुःखातून औटे परिवराला सावरण्यासाठी आणि त्यांना मदत म्हणून माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लक्ष्मण औटे यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार घनशाम अडसुळे यांची उपस्थिती होती.
यावर्षी लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. विशेषतः निलंगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्याचबरोबर वादळ व विजांचा कडकडाट तेवढ्याच प्रमाणात झालेला आहे. कांही भागांमध्ये विज पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून व्यक्तींसह जनावरेही विज पडल्याने मृत्यूमुखी पडलेले आहेत. कांही दिवसापुर्वीच तालुक्यातील लांबोटा येथील विज पडून उषाबाई औटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी औटे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत शासनाकडून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा शब्द दिलेला होता. त्यानुसार पाठपुरावा करत औटे परिवाराला शासकीय मदत जाहीर झालेली आहे. उषाबाई औटे यांचा विज पडून मृत्यू झाल्याने शासनाच्या वतीने त्यांच्या परिवारास चार लाख रूपयांची मदत जाहीर केली.
माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते औटे परिवारास या मदतीचा धनादेश देण्यात आलेला आहे. यावेळी माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांनी औटे परिवारास आगामी काळातही कोणतीही मदत लागल्यास निलंगेकर परिवार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास दिला. यावेळी नायब तहसीलदार धनंजय अडसुळे, महसुल सहाय्यक व्हि. एस. दासले, तलाठी बालाजी राठोड यांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *