• Fri. Mar 29th, 2024

शहराच्या पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी निलंगा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Byjantaadmin

Oct 4, 2022

शहराच्या पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी निलंगा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
निलंगा (प्रतिनिधी)शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन योजनेच्या नावाखाली 90 इंधन विहिरी (बोअर) मधील मोटारी काढून निलंगा वासीयांना वेठीस धरणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मोटारी सोडून पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निलंगा शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निलंगा नगरपालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनच्या नावाखाली शहरातील 90 बोअर बंद करण्यासाठी त्यातील मोटारी काढून शहरासाठी असणारी पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था बंद करण्यात आली आहे हे 90 बोअर पाडण्यासाठी कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आला होता. या मोटारी काढल्या कारणाने हे सर्व बोर निकामी होत आहे पर्यायाने माकणी धरणातून आलेले पाणीपुरवठा व्यवस्था वीज कट करणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे बंद झाल्यास शहरासाठी पाणीपुरवठा करणारी कोणतीही पर्यायी व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे निलंगेकरांना नाहक मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात सुद्धा सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्या कारणाने निलंगेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली पालिकेने टँकरची व्यवस्था सुद्धा ठेवलेली नाही अगोदरचे टँकर सुद्धा त्यांनी मोडीस काढलेले आहेत. यामुळे निलंगेकर यांच्या सोयीसाठी पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था होणे आवश्यक आहे यासाठी आज निलंगा शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी निलंगा यांना निवेदनाद्वारे तात्काळ मोटारी सोडून बोर चालू करावे अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा देण्यात आला आहे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य दुसरे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे माजी तालुकाप्रमुख बालाजी माने ईश्वर पाटील उपतालुकाप्रमुख मुस्ताफा शेख शहर प्रमुख सुनील नाईकवाडे युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब मिरगाळे युवा सेना तालुका अधिकारी प्रशांत वांजरवाडे ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजीराव पांढरे सर उपशहर प्रमुख माधव नाईकवाडे शाखाप्रमुख राहुल बिरादार अमोल कोळकर गोपाळ हिबारे महिला आघाडी तालुका संघटिका रेखाताई पुजारी सौ सविता पांढरे श्रीमती अरुणा माने रब्बानी सौदागर संतोष मोघे आधी शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *