• Fri. Apr 19th, 2024

ट्वेंटीवन शुगरची लातूर शहारा नजीकच्या शेतकी महाविद्यालयात  कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Byjantaadmin

Oct 4, 2022

ट्वेंटीवन शुगरची लातूर शहारा नजीकच्या शेतकी महाविद्यालयात  कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

लातूर :-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ट्वेंटीवन शुगरची युनिट एक, दोन, तीन च्या शेतकी खात्यातील सर्व कायम व हंगामी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा नुकतीच लातूर शहारा नजीकच्या शेतकी महाविद्यालयातील  फंक्शन हॉल  येथे संपन्न झाली.

  यावेळी ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, कार्यकारी संचालक समीर सलगर,डॉ हेमंत पाटील, ऊस विशेषतज्ञ जे .पी पाटील, नेचर केअरचे कार्यकारी संचालक जयदेव बर्वे यांच्यासह तिन्ही युनिटचे कर्मचारी उपस्थित होते.

 या कार्यशाळेत डॉ जे .पी पाटील यांनी जमीन मशागत लागवड पद्धत हंगाम निहाय जातीची निवड खोडवा व्यवस्थापन खत व्यवस्थापन या विषयावर व तर कारलेकर यांनी जमिनीची जडणघडण जमीन सुपिकता सेंद्रिय खताचे महत्त्व या विषयावर तसेच जयदेव बर्वे यांनी तोडणी व्यवस्थापन तसेच एकेरी उत्पादन वाढ व साखर उतारा वाढ यांचे कारखाना आर्थिक गणित या विषयावर सविस्तर उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेत प्रशिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची मार्गदर्शकांनी उत्तरे दिली.

या कार्यशाळेमुळे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडून कर्मचारी प्रशिक्षण तसेच शेतकरी मेळावे वारंवार घेऊन शेतकऱ्यांची सुधारित जातीचे लागवड करणे उत्पादन वाढविण्यास या कार्यशाळेमुळे मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *