• Thu. Mar 28th, 2024

निलंगा येथे आर. एस. फुटाने उपअभियंता पदी रुजू

Byjantaadmin

Oct 4, 2022

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग निलंगा येथे पदोन्नतीने आर. एस. फुटाने हे उपअभियंता पदी रुजू

निलंगा(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद उपविभाग निलंगा येथे पदोन्नतीने  आर.एस फुटाने हे उपअभियंता पदी रुजू झालेले आहेत.
श्री फुटाणे हे या अगोदर पण लातूर जिल्हा परिषद उपविभाग लातूर येथे त्यांनी उपअभियंता पदाचा पदभार व तसेच जिल्हा परिषद लातुर मुख्यालयाचा कार्यभार अतिशय़ उत्तम रित्या सांभाळला असून ते जिल्हा परिषद सेवेत मागील तीस वर्षांपासून कार्यरत आहेत व तसेच जिल्हा परिषदेत लातुरचे एक अनूभवी अभियंता म्ह्मणुन त्यांची ओळख आहे.मागिल दिवसांत लातुर येथील अभियंता दिन कार्यक्रमात जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अभियंता म्हणुन गौरव करण्यात आला.
म्हणुन आज निलंगा येथील जि.प.उपविभाग येथे रुजु दिवशी त्यांच्या पंचायत समिती,निलंगा व तसेच जि.प. उपविभाग निलंगा तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच नवनिर्वाचीत उपअभियंता श्री फुटाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निलंगा उपविभागांतरगत असलेली कामे ही सर्वाच्या सहकार्याने विहित वेळेत व गुणवत्तापुर्वक करु असे सांगीतले.
सदर कार्यक्रमात निलंगा पंचायत समितिचे गटविकास अधिकारी,अमोल ताकभाते , तत्कालीन प्रभारी उपअभियंता  बी.डी.चव्हान व जि.प.उपविभाग अंतरगत शाखा/कनिष्ठ अभियंता श्री एम.पी नरहरे, श्री टि.जे.शेख,श्री यू.जे चव्हाण,श्री ए आर मौजन,श्री डि.बी. चिंचोलकर, श्री एस.यु.राठोड.व तसेच श्री बी.एस.सुर्यवंशी व स्था.अ.स. श्री केंद्रे व जि.प.उपविभाग निलंगा अंतर्गत सर्व कर्मचारी वृंद उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *