• Sat. Apr 20th, 2024

राज्यात होणार आणखी एक युती, संभाजीराजेंची ओपन ऑफर, पण…

Byjantaadmin

Feb 27, 2023

धाराशिव, 27 फेब्रुवारी : ‘स्वराज्य संघटना ही एक ब्रँड असून आम्ही पुढील निवडणुकामध्ये युती करावी यासाठी शिंदे-फडणवीस किंवा ठाकरे यांच्याकडे जाणार नाहीत त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं’, असं म्हणत स्वराज संघटनेचं संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी ऑफरच दिली.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये आज स्वराज्य संघटनेच्या 58 शाखेचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.स्वराज्य एक ब्रँड असून शिंदे फडणवीस किंवा ठाकरे यांना गरज असेल तर त्यांनी युतीसाठी आमच्याकडे यावे आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. समविचारी पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आमची संघटना 2024 ला निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू, त्यामुळे भविष्यामध्ये सम विचारी पक्षाबरोबर युती करणार असल्याचेही संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट दिले

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते परंडा मतदार संघात स्वराज्य संघटनेच्या 58 शाखेचे आज उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात छत्रपती संभाजीराजे यांच्या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

 

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराच्या नामांतराची तयारी?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *