• Sat. Apr 20th, 2024

युट्यूबवर ‘छोटू दादा’ पहिल्या क्रमांकावर; सलमान-शाहरुखला टाकलं मागे

Byjantaadmin

Mar 31, 2023

सिनेतारकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शारुख खान आणि सलमान खान (Salman Khan) या बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असतात. त्यांच्या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळतात. पण सध्या युट्यूबवर (Youtube) सलमान (Salman Khan), शाहरुख (Shah Rukh Khan) नव्हे तर शफीफ नाटिया (Shafeeq Natya) ट्रेडिंगमध्ये आहे. शफीफ अर्थात ‘छोटू दादा’च्या व्हिडीओला युट्यूबवर लाखो-कोटी नव्हे तर अब्जावधीत व्ह्युज मिळाले आहेत.

छोटू दा के गोलगप्पे’ला मिळालेत अब्जावधीत व्ह्युज (Chotu Dada Video Billions Views)

लोकप्रिय युट्यूबर शफीक नाटिया त्याच्या विनोदी शैलीतील व्हिडीओमुळे कायम चर्चेत असतो. युट्यूबर त्याचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. सध्या त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘छोटू दा के गोलगप्पे’ (Chotu Dada Ke Golgappe) असं या व्हिडीओचं नाव आहे. या व्हिडीओमध्ये शफीक लोकांना पाणीपुरी खाऊ घालताना दिसत आहे. चार वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओला युट्यूबवर 1,696,598,521 व्ह्युज मिळाले आहेत.

शफीक नाटियाचं ‘खानदेशी मूव्हिज’ नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला अब्जावधीत व्ह्युज मिळाले आहेत. तसेच त्याच्या या चॅनलचे 33.3 मिलियनपेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींपेक्षा शफीकचे जास्त फॉलोअर्स आहेत. युट्यूबसह इन्स्टाग्रामवरदेखील शफीकचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टावर त्याचे 238k पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

युट्यूबवर छोटू दादाची दादागिरी!

शफीक नाटिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असण्यासोबत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवरदेखील त्याने छाप सोडली आहे. छोट्या पडद्यावर ‘छोटू दादा की दादागिरी’ नावाचा त्याचा कार्यक्रमदेखील आहे. छोटू दादाने आपल्या नौटंकीने सर्वांनाच वेड लावलं आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

युट्यूब स्टार शफीक नाटिया त्याच्या खऱ्या नावापेक्षा ‘छोटू दादा’ या नावाने जास्त लोकप्रिय आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. उंचीकडे दुर्लक्ष करत त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर भर दिला आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या असण्यासोबत स्वत:चं आलिशान घरदेखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *