• Fri. Apr 19th, 2024

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा लातूर जिल्हा दौरा

Byjantaadmin

Apr 30, 2023

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा लातूर जिल्हा दौरा

लातूर, दि.30  : राज्याचे कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार हे सोमवार, दिनांक 1 मे, 2023 रोजीच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार, दिनांक 1 मे, 2023 रोजी दुपारी 12-00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने हिंगोली-नांदेड मार्गे लातूरकडे प्रयाण. दुपारी 4-30 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे आगमन. दुपारी 5-00 वाजता लातूर येथील कृषी महाविद्यालय येथे अनुसूचित जाती / जमाती विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृहाचे लोकार्पण समारंभास उपस्थिती. सांयकाळी 7-00 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूरकडे प्रयाण, आगमन व राखीव. रात्री 10-00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून लातूर रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. रात्री 10-30 वाजता लातूर रेल्वेस्थानक येथून लातूर एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *