• Fri. Apr 19th, 2024

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा; अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं?

Byjantaadmin

Apr 30, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Amit Shah-Eknath Shinde Meeting

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) हे सरकार स्थिर असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहतील, असं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा राजकीय वर्तुळात असल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच आज अमित शाह, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्वाची बैठक झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे.

या बैठकीमध्ये अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांना मोठं आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील आगामी सर्वच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील, असं आश्वासन शाहांनी त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे आता यापुढे आगामी निवडणुकीत भाजप आणि SHIVSENA  (शिंदे गट) युतीची धुरा एकनाथ शिंदेंकडे असण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत सर्वाचं एकमत झालं असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.दरम्यान, अमित शाह हे खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे,DEVENDRA FADNVIS यांच्याबरोबर बंद दाराआड बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या चर्चेत नेमकी काय ठरलं?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *