• Thu. Apr 18th, 2024

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी लातूरात शहर जिल्हा भाजपाची पुर्वतयारी आढावा बैठक

Byjantaadmin

May 5, 2023
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी लातूरात शहर जिल्हा भाजपाची पुर्वतयारी आढावा बैठक
लातूर/प्रतिनिधीः- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी  धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच लातूर येथे बुधवार दि. 10 मे 2023 रोजी येत आहेत. प्रदेशाध्यक्ष बानकुळे यांचे दिवसभर शहरात विविध कार्यक्रम असून या निमित्ताने ते भाजपाच्या पदाधिकार्‍यांची आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत. या कार्यक्रमांना आणि बैठकीस लातूर शहर व परिसरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजप प्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केले आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आ. चंद्रशेखर बावनकुळे बुधवार दि. 10 मे रोजी प्रथमच लातूर दौर्‍यावर येत आहेत. या निमित्ताने शहर जिल्हा भाजपाची पुर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, सरचिटणीस शिरिष कुलकर्णी, प्रविण सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत गुरुनाथ मगे यांनी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे प्रथमच लातूरला येत असल्याने त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करून हा दौरा यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात येत असल्याचे सांगितले. नांदेड येथून मंगळवारी रात्री मुक्कामी येणारे प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे बुधवार दि. 10 मे रोजी सकाळी प्रथम शहरात एका युवा वॉरिर्यस शाखेचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटात्मक आढावा बैठक पार पडणार असून या बैठकीला लातूर शहरासह ग्रामीणचे पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याचेही गुरुनाथ मगे यांनी सांगितले. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सोशल मिडिया सेलची बैठक घेणार आहेत. तसेच शहरातील कोणत्याही एका बुथला प्रदेशाध्यक्ष भेट देणार असून याठिकाणी बुथ अध्यक्षांसह समिती सदस्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे. शहरातील लिंगायत व तेली समाज बांधवाची बैठक प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांच्या उपस्थिती घेण्यात येणार असून यानंतर शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीची बैठक त्यांच्या उपस्थिती पार पडणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन गुरुनाथ मगे यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात संघटन सरचिटणीस अ‍ॅड. दिग्विजय काथवटे यांनी प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे प्रथमच लातूर दौर्‍यावर येत असून त्यांचे स्वागत लातूर पॅटर्नला साजेसे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून शहरात विविध ठिकाणी स्वागत फलक, कमानी व पक्षाचे झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात यावे असेही आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांचा हा दौरा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी बुस्टर डोस देणारा ठरणार असल्याने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या दौर्‍यात सहभागी होऊन भाजपाची ताकद यानिमित्ताने शहरात दाखवून द्यावी असे आवाहनही केले.  या बैठकीला मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *