• Fri. Apr 19th, 2024

बुद्ध गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी

Byjantaadmin

May 5, 2023
बुद्ध गार्डन येथे बुद्ध जयंती साजरी
भारतीय बौद्ध महासभा,तिसरी बौद्ध धम्म परिषद अध्यक्ष मंडळाच्या व बुद्ध गार्डन ट्रस्टच्या वतीने दिनांक 5 मे 2023 रोजी बुद्ध गार्डन लातूर येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करून महाबुद्ध वंदना घेण्यात आले,.भंते अश्वघोष यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर भंते धम्मबोधी यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले,.
याप्रसंगी भन्ते अश्वघोष भंते धम्मबोधी यांनी धम्मदीक्षा दिली.
या कार्यक्रमाला उपस्थित उपासकांना भोजनदान देण्यात आले.या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रदीप राठी सह सर्व ट्रस्टी,लक्ष्मण कांबळे,चंद्रकांत चिकटे प्रा.अनंत लांडगे,अशोकराव कांबळे,बालाजी कांबळे प्रा. डी.टी सूर्यवंशी,प्रा.विजय श्रृंगारे प्रा.एसटी चांदेगावकर उमेश श्रृंगारे,रमेश श्रृंगारे,बनसोडे,ए.आर लामतुरे,बसवंत उबाळे,ऍड.बादाडे प्रा.मस्के,ऍड.अतिश चिकटे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सचिन गायकवाड,सौ.भारती लामतुरे,सौ.रत्नमाला अंभोरे,बापूराव कांबळे,हिराचंद गायकवाड,प्रा.बापू गायकवाड,सौ.रत्नमाला घोडके,एचडी इंगळे,मुगळे ताई,सत्यमाला निलंगेकर,विमल इंगळे इत्यादी सह लता कांबळे,शारदाबाई कांबळे,शांता कांबळे यांच्यासह अनेक बुद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *