• Wed. May 31st, 2023

निलंगा बाजार समिती सभापतीपदी चिंचनसुरे, उपसभापतीपदी देशमुख

Byjantaadmin

May 25, 2023
निलंगा बाजार समिती सभापतीपदी चिंचनसुरे, उपसभापतीपदी देशमुख
निलंगा : निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवकुमार चिंचनसुरे यांची तर उपसभापतीपदी लालासाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुतन पदाधिकारी यांचे कार्यकर्ते व कर्मचारी यांनी स्वागत केले. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर नवनिर्माण शेतकरी विकास पॅनलचे १८ पैकी १८ संचालक मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. नवनिर्वाचीत संचालकांची आज बैठक झाली. या बैठकीत एक मताने वरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
औराद शाहाजनी कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी  नरसिंग  बिरादार यांची तर उपसभापती शाहूराज थेटे  यांची निवड करण्यात आली. येथे ही  या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *