• Sat. Apr 20th, 2024

दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून ; मोफत अस्थिरोग शिबिरात वाहतूक पोलिसांसह १८५ रुग्णांची तपासणी

Byjantaadmin

May 26, 2023

पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत अस्थिरोग
शिबिरात वाहतूक पोलिसांसह १८५ रुग्णांची तपासणी
लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटल ऍक्सीडेन्ट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात वाहतूक शाखेच्या ४८ पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १८५ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.
या मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगावचे प्राचार्य वैभव कलुबर्मे, लातूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे,शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी पोद्दार हॉस्पिटलचे संचालक डॉ.अशोक पोद्दार, युवा नेते अभिजित देशमुख, संचेती हॉस्पिटल पुणेचे मणका विकार तज्ज्ञ डॉ. निषाद सितूत, डॉ. चेतन सारडा, डॉ. विश्रांत भारती , माजी उपमहापौर कैलास कांबळे, रामेश्वर सोमाणी, जयेश बजाज, विजय रांदड, संजीव भार्गव यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने प्रतिवर्षी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती आणि पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अशा प्रकारचे मोफत अस्थिरोग व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते. पोद्दार हॉस्पिटलमध्ये प्रतिवर्षी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधून दिवसभर त्यांच्या भाषणाच्या व्हिडीओ दाखविण्यात येतात. यावर्षीही त्या दाखवण्यात आल्या. व्यक्तिगत पातळीवर डॉ. अशोक पोद्दार हे प्रतिवर्षी मोफत शिबिरांचे आयोजन करतात. लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात असा आगळा वेगळा पॅटर्न आणण्याचे कामच मुळी डॉ. अशोक पोद्दार यांनी केले आहे,असे म्हटले तर ते याठिकाणी अतिशयोक्तीचे होणार नाही. वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यातही डॉ. अशोक पोद्दार कायम अग्रेसर असतात हे सर्वज्ञात आहेच.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्राचार्य वैभव कलुबर्मे यांनी या अस्थिरोग व मोफत आरोग्य शिबिरास आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक पोद्दार यांच्या अतुलनिय कामाचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्दच नाहीत , असे सांगून आपण दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल खूप काही ऐकून होतो. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या नगरीत आपल्याला कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली, ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी डॉ. पोद्दार यांच्या आरोग्यविषयक कामाचे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला एक तरी चांगला मित्र असावा असे म्हटले जाते. डॉ. पोद्दार यांचे हे कार्य पाहून त्यांच्यारूपाने आरोग्य – वैद्यकीय क्षेत्रातही आपले मित्र आहेत ही बाब अत्यंत मोलाची असल्याचे देवरे यांनी बोलून दाखविले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी यावेळी बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी डॉ. अशोक पोद्दार यांनी या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दलही त्यांनी डॉ. पोद्दार यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
युवा नेते अभिजित देशमुख यांनीही या उपक्रमास आपल्या शुभेच्छा देताना डॉ. अशोक पोद्दार आणि देशमुख परिवाराचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याचे नमूद केले. दिवंगत लोंकेटे विलासराव देशमुख यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे औचित्य साधून पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने ज्या शिबिरांचे आयोजन केले जातें त्याला तोड नाही,असेही ते म्हणाले. डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रतिवर्षी आपल्या हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारचे शिबीर घेण्यात येते. मात्र यावेळी मोफत अस्थिरोग शिबिराबरोबरच वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरही घेतल्याचे सांगितले. या शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व क्लिनिकल तपासण्या, रक्त तपासणी, ईसीजी,हाडाच्या ठिसूळतेची तपासणी, एक्सरे, फिजिशियन व अस्थिशल्य चिकित्सकांचा सल्लाही मोफत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इतर रुग्णांना नेहमीप्रमाणे मोफत अस्थिरोग तपासणी, हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी, मोफत फिजिओथेरपी, मोफत औषधी देण्यात आली. तसेच रक्त तपासणीत ५० टक्के सूट, डिजिटल एक्सरेमध्ये ५० टक्के सूट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात हायटेक च्या डॉ. याडकीकर , डॉ. कुर्डुकर, सिट्रस पॅथॉलॉजी लॅबचे डॉ. मंगेश कुलकर्णी , संचेती हसोफ्तल पुणे व औषधी कंपन्यांचे सहकार्य लाभल्याचे डॉ. पोद्दार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणकेश्वर आलमले यांनी केले. या शिबिरात रुग्णांच्या तपासणीसाठी डॉ. निशाद सितूत डॉ. इम्रान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसीम कादरी यासह पोद्दार हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *