• Wed. May 31st, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्राच्या नेतृत्वात २ नगराध्यक्षांसह १५ नगरसेवक शिंदे गटात

Byjantaadmin

May 26, 2023

गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठे खिंडार पडले असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांचे सुपुत्र सुगत मनोहर चांद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नगराध्यक्ष आणि १५ नगरसेवकांनी आज, शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.

eknath shinde

या प्रसंगी शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू उपस्थित होते . या प्रवेशामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते खा. प्रफुल पटेल आणि माजी आमदार राजेन्द्र जैन यांचा नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये सडक अर्जुनी नगर पंचायतचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना किशोर डोंरगरवार, बांधकाम सभापती अंकित टिकाराम भेंडारकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र जयपाल वंजारी, पाणी पुरवठा सभापती साईस्ता मतीन शेख, महिला बाल कल्याण सभापती दीक्षा राजकुमार भगत , माजी नगरअध्यक्ष देवचंद तरोने, माजी नगर अध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, नगर सेवक गोपीचंद धोंडू खेडकर, नगर सेवक अशलेस मनोहर अंबादे, नगर सेवक तायमा जुबेर शेख, नगर सेवक कामिनी कोवे, दिलीप गभने माजी नगसेवक, धानवंत कोवे, विदेश टेंभुर्ने, मतीन शेख, मोरगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, बांधकाम सभापती सागर आरेकर व नगरसेवक दीक्षा शहारे आणि इतर दोन नगरसेवकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *