• Fri. Apr 19th, 2024

लोकनेते विलासरावजी देशमुख यांची ७८ वी जयंती मांजरा कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरी

Byjantaadmin

May 26, 2023

लोकनेते विलासरावजी देशमुख यांची ७८ वी जयंती मांजरा कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरी

विलासनगर:– महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या २६ मे २०२३ जयंती निमित्ताने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे
कारखाना साइटवर  लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, जागृती कारखान्याचे व्हा चेअरमन लक्ष्मणराव मोरे,साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जिल्हा बँकचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे,रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे,जिल्हा बँकचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,संतशिरोमणीचे व्हा चेअरमन शाम भोसले,मांजरा कारखाना संचालक मंडळ, कार्यकारी संचालक पंडीत देसाई,खाते प्रमुख आदींनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर कारखान्यातील कामगारांसाठी सर्व रोग निदान व नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले. सर्व रोग निदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सह्याद्री हॉस्पिटलचे डाॅ हनुमंत किनीकर व त्यांचे सहकारी डॉअमोल शेकडे पाटील,डाॅ सुदर्शन गुंठे,डाॅ प्रमोद लोकरे,डाॅ नलावडे, यांचे व नेत्र तपासणी शिबिरासाठी जमादार हॉस्पिटलचे डाॅ इम्रान व मोफत चष्मा वाटपासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर अक्षरा  ऑप्टिकल व आय केअर रेनापुर चे ऑप्टिशियन श्री भागवत डी टमके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरील शिबिरामध्ये एकूण साडेतीनशे  कारखाना कामगारांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली तसेच 150 कर्मचाऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप मांजरा कारखाना व अक्षरा ऑप्टिकल व आय केअर रेनापुर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *