• Fri. Apr 19th, 2024

लातूरचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व अबाधित राखून सर्व सोयी सुविधांनीयुक्त शहराच्या उभारणीत क्रेडाई पुढाकार घेईल– माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

May 26, 2023

लातूरचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व अबाधित राखून सर्व सोयी सुविधांनीयुक्त शहराच्या उभारणीत क्रेडाई पुढाकार घेईल– माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर क्रेडाईचा पदग्रहण समारंभ संपन्न

लातूर प्रतिनिधी :अत्यंत गतीने विकसित होत असलेल्या लातूर शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अबाधित राखून आधुनिक सोयी सुविधांनीयुक्त शहराची उभारणी
करण्याससाठी ही संघटना पुढाकार घेईल असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) लातूर शाखेच्या पदग्रहण समारंभ कार्यक्रम प्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते. क्रेडाई ही बांधकाम क्षेत्रातील देशपातळीवर काम करणारी संघटना असून, या संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिक व ग्राहक यांचे हित साधण्याचे काम केले जाते या संघटनेच्या नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. २६ मे रोजी लातूर शहरातील एम.आय.डी.सी.कळंब रोड येथील हॉटेल उत्सव स्क्वेअर या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, क्रेडाई मुळे मला बांधकाम क्षेत्रातील नवीन माहिती मिळाली आहे. लातूर शहरात क्रेडाई कमी कालावधीत नावारूपाला येत आहे असे म्हणत अत्यंत गतीने विकसित होत असलेल्या लातूर शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अबाधित राखून आधुनिक सोयी सुविधांनीयुक्त शहराची उभारणी करण्याससाठी ही संघटना पुढाकार घेईल असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. लातूर शहराची ठेवण आणि येथील नागरिकांच्या गरजा यात सुरुवातीपासूनच लोकनेते विलासराव देशमुख यांनी बारकाईने लक्ष घातले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख या सर्वानीच लातूरला आपलं घर मानून ते पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईची ठेवण हि फ्रान्स देशातील शहरासारखी आहे. आणि म्हणून
गंजगोलाई हि आपल्या लातूरची ओळख आहे. मुंबई, पुणे सोडले तर अशी वास्तू फक्त लातूरातच पाहायला मिळते. पुढे बोलताना ते म्हणाले की, गंजगोलाईला शंभर वर्षे पूर्ण झाले असून याबद्दल केंद्र व राज्य सरकारकडून १०० कोटी रुपये प्राप्त करून घ्यावे लागतील. उद्याचं लातूर घडवण्याची क्षमता क्रेडाईत आहे. क्रेडाईने नियमानुसारच सर्व काम करावे लातूर शहराचा विस्तार होतोय, त्यामुळे क्रेडाईने परवडणाऱ्या घरांची निर्मिती सर्व सामान्य माणसासाठी करायला हवी लातूरला एक आगळे वेगळे शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण सार्वजनमिळून प्रयत्न करुया आणू त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीन अशी ग्वाही त्यांनी दिली. लातूर शहरातही सध्या प्रदूषण वाढत आहे. लातूर आज कायद्याने चालणारे शहरआहे. प्रत्येक लातूरकर कायद्याचे पालन करतो त्यामुळेच येथे गुणवत्ता रूजली  आहे.लातूर वेगवेगळ्या प्रकारे आज विकसित होत आहे इतर राज्यातून
विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहेत . सोलर एनर्जी, वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग, एसटीपी, कचरा झिरो गार्बेज यासारख्या योजना तयार करणे, देशात जे काम सुरू आहे तसे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय काम लातूरातही सुरू व्हावे. लातूरत इतर राज्यातूनही कामगार येऊन काम करतात त्यांना काम करण्याची स्वातंत्र्यआहे.  लातूरला पिण्याचे पाणी कमी पडणार नाही कारण लातूर महानगरपालिकेने २०५४ सालापर्यंतच्या पिण्याच्या पाण्याच नियोजन केले आहे. क्रेडाईनेही अत्याधुनिक सोयीसुविधा लातूर शहरात उभारण्याचा प्रयत्न करावा असे सांगून त्यांनी क्रेडाईच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी लातूर क्रेडाईच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात नूतन अध्यक्ष- जगदीश कुलकर्णी, भावी अध्यक्ष- उदय पाटील, उपाध्यक्ष- महेश नावंदर, उपाध्यक्ष- किरण मंत्री, उपाध्यक्ष- अमोल मुळे, सचिव-संतोष हत्ते, कोषाध्यक्ष- आशीष कामदार, सहसचिव- विष्णू मदने, श्रीकांत हिरेमठ, व्यवस्थापन समितीचे सदस्य- दीपक कोटलवार, डॉ. धर्मवीर भारती, नागनाथ गित्ते तर युथ को-ऑर्डिनेटर म्हणून आकाश कोटलवार, युथ विंगचे को-ऑर्डिनेटर निरज मंत्री, वुमन विंग को-ऑर्डिनेटर रिचा नावंदर, जयनंदा
गित्ते आदीनी पदग्रहण स्वीकारले. क्रेडाईचे माजी सचिव महेश नावंदर, धर्मवीर भारती, माजी अध्यक्ष सुबोध बेळंबे, संतोष हत्ते, कालिका स्टीलचे यश गोयल, महाराष्ट्र क्रीडाईचे
अध्यक्ष प्रमोद खैरनार, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन अध्यक्ष जगदीश कुलकर्णी यांनी करून क्रेडाइच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संजय जेवरीकर यांनी केले तर शेवटी आभार उदय पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *