• Wed. Apr 24th, 2024

जो पर्यंत समाजातील महिलांचा सर्वांगीन विकास होत नाही तो पर्यत देशाचाही विकास शक्य नाही-आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

Byjantaadmin

May 31, 2023

जो पर्यंत समाजातील महिलांचा सर्वांगीन विकास होत नाही तो पर्यत देशाचाही विकास शक्य नाही असे मत माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व्यक्त केले….

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तहसिल व पंचायत समितीच्या बालविकास सशक्त नारीसमृध्द भारत या संकल्नेवर आधारीत पुण्य शौक्ल अहिल्याबाई होळकर स्ञी शक्ती समाधान शबीर आयोजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताञय गीरी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,सोपान अकेले माजी उपाध्यक्ष जि.प.भारतबाई सोळु.के,शेषराव ममाळे,काशीनाथ गरीबे,मंगेश पाटील अदि व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की महिला या समाजाचा सक्षम आधार असून राजकीय क्षेञात स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाना ५० टक्के संधी देण्यात आली आहे.राज्य सरकार महिलासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असून त्याचा फायदा ग्रामीत व शहरातील महिलानी घ्यावा स्वतासाठी महिलानी पुढाकार घ्यावा महिला वर्गाच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न केले पाहिजे त्याच बरोबर स्वविकासाठी महिलानी पुढ आले पाहिजे…यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या की राज्य व केंद्र शासन महिला सबलीकरन करण्यासाठी स्वंय साह्ययता बचत गटासाठी अनेक योजना राबवत आहे.महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही काम पूर्ण होणे शक्य नाही यशस्वी पुरूषामागे सक्षम महिलांचा आधार असतो ते विसरता येणार नाही असे त्यानी सांगितले.प्रारंभी पुण्य श्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले यावेळी ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात हजर होत्या हा कार्यक्रम डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर समागृहामध्ये पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *