• Fri. Mar 29th, 2024

HDFC बँकेच्या निलंगा येथील शाखा उदघाटन संपन्न

Byjantaadmin

May 31, 2023

एचडीएफ बँकेच्या निलंगा येथील शाखा उदघाटन संपन्न

निलंगा/प्रतिनिधी बँकिग क्षेञातामध्ये बँकांनी वैयक्तिक व सार्वजनिक कर्ज पुरवठा करीत असताना शेतकऱ्यांच्या शेती पिकालाही मुबलक प्रमाणात कर् पुरवठा करावा जेणेकरून शेतकऱ्यांची घडी बसवण्यासाठी हातभार लागेल असे आव्हान उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यानी केले…त्या एचडीएफ बँकेच्या निलंगा येथील शाखा उदघाटन प्रसंगी बोलत होत्या…प्रथमथा फित कापून व दिप प्रल्वलन करून या शाखेचे उदघाटन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ दिनेशकुमार कोल्हे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,लातूर उस्मानाबाद विभागीय अधिकारी विशाल जाधव,लोन विभागीय अधिकारी प्रमोद आळने,अभिषक शर्मा,गणेश जोशी,शाखा व्यवस्थापक भीम बिराजदार अदि प्रमुख उपस्थित होते.पुढे बोलताना शोभा जाधव म्हणाल्या की व्यापारी वर्गातील लोकांना आपली शाखा कर्ज पुरवठा करणार आहे.परंतु ग्रामीण भागातील शेतकरी हा देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कना आहे.शेती माल व शेतीला जोड धंदा करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून अनेक योजना राबवाव्यात आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्याना आर्थिक मदत कृरावी व त्यांची उन्नती करण्यासाठी आपल्या बँकेने हातभार लावावा अशा सुचना बँक अधिकाऱ्यांना सौ.जाधव यानी केल्या एचडीएफसी बँकेचे नाव बँकिग क्षेञात मोठे असून समाजातील उपेक्षित व गरजू लोकांपर्यंत बँकेच्या योजना पोहचण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सुचना जाधव यानी केल्यायावेळी उपविभागीय अधिकारी डॉ दिनेशकुमार कोल्हे,लातूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन राजेंद्र सुर्यवंशी यानीही नवीन एचडीएफसी बँक शाखेला शुभेच्छा दिल्या. निलंगा शहरातील अनेक नामवंत व्यापारी या बँक उदघाटन प्रसंगु उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *