• Wed. Apr 24th, 2024

प्रेयसीने प्रियकराची हत्या का केली? वाघोलीतील हत्येचा धक्कादायक उलगडा

Byjantaadmin

May 31, 2023

PUNE जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून   प्रेयसीने प्रियकराची चाकूने वार करत हत्या केली होती. या हत्या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. गेल्या एक वर्षांपासून यशवंत आणि अनुजा हे एकमेकांना ओळख होते. मात्र यशवंत हा तिला सारखा त्रास देत होता. तिच्यावर संशय घेत होता. यावरुन दोघांची भांडणं झाली आणि प्रेयसीने  प्रियकरावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करुन हत्या केली  होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या हत्या करणाऱ्या प्रेयसीला अटक केली आहे.

Pune Crime News girlfriend ended the life of her boyfriend in wagholi pune Pune Crime News :  प्रेयसीने प्रियकराची हत्या का केली? वाघोलीतील हत्येचा धक्कादायक उलगडा

रागात असताना प्रेयसीने प्रियकरावर चाकूने हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतली होती. मात्र, वसतिगृहातील मुलांमुळे तिचा जीव वाचला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते. यशवंत महेश मुंडे ( वय 22) LATUR  असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. अनुजा महेश पनाळे असं 21 वर्षीय प्रेयसीचं नाव आहे.

अनुजा आणि यशवंत यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या एक वर्षांपासून सोबत होते.  यशवंत हा तिच्यावर संशय घेत तिला मानसिक त्रास देत होता. तिच्यावर अनेक बंधने देखील आणत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. या संदर्भात त्यांच्या घरच्यांना देखील माहिती असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्याच्या आदल्या रात्री म्हणजेच रविवारी  यशवंत राहत असलेल्या वसतिगृहात अभ्यासासाठी गेली होती. त्यांचे सोमवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा जोरात भांडण झाले. त्या भांडणात अनुजा हिने यशवंत याच्या छातीवर आणि पोटावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

हत्या केली नंतर नस कापून घेतली..

वसतीगृहात या प्रेयसीने प्रियकरांची हत्या केली. त्यानंतर तिने आपल्या हाताची नस कापून घेतली.  घाबरलेल्या अवस्थेत बाहेर बाकावर येऊन बसली. हा सगळा प्रकार वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी पाहिला. त्यावेळी तिचं प्रचंड प्रमाणात रक्त गेलं होतं. तिची अवस्था पाहून वसतीगृहातील मुलांनी तिला दवाखान्यात दाखल केलं होतं. त्यामुळे तिचा जीव वाचला. त्यानंतर वसतीगृहात हत्या झाल्याचं कळलं आणि वसतीगृहात खळबळ उडाली होती.  आपल्याला तो मानसिक त्रास देत होता. त्यातून हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *