• Thu. Apr 18th, 2024

काठी अन् घोंगडं देवून युवराज भुषणसिंहराजे होळकर यांचे स्वागत

Byjantaadmin

May 31, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २८९ व्या जयंती निमित्त आज लातूर येथे होळकर घराण्याचे तेरावे वंशज युवराज भुषणसिंहराजे यांनी हजेरी लावली. यावेळी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्यासह युवराज भुषणसिंहराजे यांचे काठी अन् घोंगड देवून स्वागत करण्यात आले.

आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतीनिमित्त आज latur येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित सोहळ्यात युवराज भुषणसिंहराजे होळकर (होळकर घराण्यातील १३वे वंशज), माजी मंत्री दिलीपराव देशमुख,आमदार धिरज देशमुख आमदा रअभिमन्यू पवार, सहभागी झाले होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या भल्यासाठी मोलाची भूमिका बजावली.राज्यकारभार आणि न्यायदानात त्या अतिशय निष्णात होत्या. विपुल जनकार्याद्वारे कुशल प्रशासनाचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला. जो कायम आपल्याला प्रेरणा देत राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.यावेळी माजी आमदार मा. त्र्यंबक भिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, आबासाहेब पाटील, विलास को. ऑप बँकेचे संचालक चंद्रकांत धायगुडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *