• Fri. Mar 29th, 2024

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बस स्थानकास डस्टबिन भेट

Byjantaadmin

May 31, 2023
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बस स्थानकास डस्टबिन भेट
निलंगा : प्रतिनिधी 31 मे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जाकीर सामाजिक विकास संस्था अंतर्गत जनहीत स्वच्छता अभियान टीम तर्फे निलंगा बस स्थानकास डस्टबिन भेट देण्यात आले.
            नेहमी मनोरुग्णाची सेवा,बस स्थानकाची स्वच्छता,महापुरुषांच्या जयंत्याच नव्हे तर जयंत्या साजरी झाल्यानंतर संबंधित जागेवरील सवच्छेने स्वछता करणे आदी कामे मागील अनेक वर्षांपासून ही संस्था करित आहे तसाच पुढाकार स्वतःहून घेऊन बस स्थानक येथे कचरा कुंडी नसल्याने  सर्वत्र पसरून दिसत असल्याचे लक्षात येताच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधून डस्टबिन निलंगा बस स्थानकास भेट म्हणून देण्यात आले.या उपक्रमाचे नागरिकात व बस डेपो कर्मचाऱ्यातून कौतुक होत आहे .      यावेळीअनिल राजेंद्र बिडवे आगार प्रमुख एम जी कोळी श्रीनिवास भोयणे अनिल जाधव व्ही एन चौधरी निलेश गायकवाड मयनु शेख सोहेल शेख ऋषिकेश पोतदार राहुल पोतदार जाकीर शेख मिथुन शेटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *