• Sat. Apr 20th, 2024

देशाच्या अर्थव्यवस्थेची गती घसरली, जीडीपी दर ७.२ टक्के

Byjantaadmin

May 31, 2023

आॅक्टोबर ते डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ ४.४ टक्के होती. जुलै ते सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत तो ६.३ टक्के होता. तर जानेवारी ते मार्च २०२२ च्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ ४.१ टक्के होती.

GDP Growth : गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारताचा जीडीपी दर ६.१ टक्के दराने वाढत हृोता. तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये वाढ ७.२ टक्के राहिली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या समकालात तो ९.१ टक्के होता. त्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावला आहे. जानेवारी ते मार्च (२०२३ च्या चौथी तिमाहीत) भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरात चांगली वाढ पहायला मिळाली आहे. २०२३ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी ६.१ टक्के दराने वाढला आहे.याआधी आॅक्टोबर ते डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत जीडीपी दर ४.४ टक्के होता. तर जुलै ते सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत तो ६.३ टक्के नोंदवण्यात आला होता. एका वर्षापूर्वी जानेवारी ते मार्च २०२२ च्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर ४.१ टक्के नोंदवण्यात आला होता

कोअर सेक्टरची वाढ

आठ कोअर सेक्टरमध्ये एप्रिल २०२३ मध्ये वाढ मंदावली आहे. या महिन्यात अंदाजे ३.५ टक्के दराने या क्षेत्रातील वाढ नोंदवण्यात आली आहे. ही गेल्या सहा महिन्यातील निचांकी पातळी आहे. प्रामुख्याने खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादन आणि वीजेचे उत्पादन घटल्यामुळे कोअर इंडस्ट्रीजच्या वाढीला लगाम बसला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोअर इंडस्ट्रीजचे उत्पादन ९.५ टक्के दराने वाढले होते.

मार्च २०२३ मध्ये इंडस्ट्रीजचा वृद्धी दर ३.६ टक्के होता. पायाभूत सुविधा क्षेत्रांत आॅक्टोबर २०२२ नंतर सर्वाधिक घट नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *