• Thu. May 9th, 2024

औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अशोकराव पाटील निलंगेकर यांची अशोक बंगला येथे सदिच्छा भेट घेतली

Byjantaadmin

Jul 31, 2023

औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अशोकराव पाटील निलंगेकर यांची अशोक बंगला येथे सदिच्छा भेट घेतली

निलंगा- औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांची सदिच्छा भेट घेऊन परवा झालेल्या वाढदिवसानिमित त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघात असलेल्या 63 गावासबंधी व नवीन अप्पर तहसील कार्यालय कासार सिरशी येथे होत असलेल्या विषयासंबंधी सविस्तर चर्चा झाली.यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या तालुक्यावर जीवापाड सांभाळ केला असून या तालुक्यात विविध विकासरूपी योजना आणल्या.आज जरी नव्याने येथे अप्पर तहसील कार्यालय होत असेल आणि कासारसिरशी,ममदापूर,तांबला, कासार बालकुंदा रामलिंग मुदगड,व इतर परिसरातील गावांची सोय होत असेल तर आनंदच आहे.त्याचबरोबर निलंगा शहरालगत असलेल्या बामणी,जेवरी, शिंगनाळ,माळेगाव, लिंबाळा,व इतर गावे निलंगा तहसीललाच कायम राहावे.जेणेकरून ज्या उद्देशाने अप्पर तहसील कार्यालय कासार सिरशी येथे झाले त्या भागातील महसूल विभागाचे कामे सोयीस्कर होतील व निलंगा जवळच्या असलेल्या निलंगा तहसीलला जोडल्यामुळे त्यांची पण जनतेला सोय होईल.आपण शासनात आहात..आज अप्पर तहसील झालेले आहे कासार सिरशी तालुका करून अप्पर तहसील कार्यालयाचे तहसील कार्यालयामध्ये रूपांतर करावे.व ममदापुर,तांबळा, कासारबालकुंदा तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावातील नागरिकांना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कामासाठी जाण्यासाठी 100 ते 125 मीटरचे अंतर पार करावे लागते हा भौगोलिक दृष्टिकोन समोर ठेऊन निलंगा येथे अप्पर जिल्हा कार्यालय करावे अशी मागणी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्फत शासनाकडे मागणी केली.केलेल्या मागणीवर आमदार म्हणाले की,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले या सर्वांशी चर्चा करून अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केलेली मागणी पूर्णत्वाकडे घेऊन जाईन असे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *