• Wed. May 8th, 2024

शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातील लातूर शहर औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातील होऊ द्या चर्चा

Byjantaadmin

Sep 30, 2023
लातूर जिल्ह्यातील लातूर शहर औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातील होऊ द्या चर्चा या अभियानासाठी नेमण्यात आलेले वक्ते व नियोजन करते तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांचे प्रशिक्षण शिबिर
 लातूर जिल्ह्यामधील लातूर शहर औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यातील शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर होत असलेले *होऊ द्या चर्चा* हे अभियान लातूर जिल्ह्यामध्ये वरील पाच तालुक्यांमध्ये यशस्वी पार पाडण्यासाठी सदरील अभियान प्रत्येक गावामध्ये तांडा,वस्ती वाड्यावर पोहोचवण्यासाठी व सक्षमपणे मांडणी करून भारतीय जनता पार्टीचा खोटारडेपणा दगाबाज शिंदे गट व महाराष्ट्र सरकार यांच्या फसव्या योजना केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासनाची करून सदरील अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सदरील  होऊ द्या चर्चा अभियान पोहोचवण्यासाठी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या पुढाकाराने सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये उद्घाटक म्हणून औसा तालुक्याचे माजी आमदार माननीय दिनकरराव माने हे होते. सदरील शिबिराचा समारोप लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी केला. यावेळी.आमदार रोहिदास चव्हाण म्हणाले की सदरील प्रशिक्षण शिबिर हे अत्यंत महत्त्वाचे असून जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांचे मी कौतुक करतो असे शिबिर घेऊन प्रशिक्षण देऊन व ते तरबेज करून नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला योग्य सूचना करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारचे नियोजन करणे अत्यंत गरजेचं होतं ते जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केलेला आहे. यात मला खूप आनंद आहे. निश्चितच या प्रशिक्षणाचा फायदा सर्व पदाधिकारी घेतील *होऊ द्या चर्चा* हे अभियान यशस्वी करतील यात मला आता शंका नाही. महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत असताना कष्ट कऱ्याना दोन टायमाच्या पोट भरण्याची चिंता असताना सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. सर्वसामान्य नसणारे केंद्रातला न राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी महाराष्ट्र दृष्टी असून केलेल्या घोषणा फसव्या असून दिलेली आश्वासन पूर्ण न करणार हे सरकार असून या सरकारच्या कालखंडामध्ये एकही चांगलं काम झालेलं नाही आणि होऊ शकत नाही म्हणून सर्व वक्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नियोजन करताना नियोजनबद्ध कार्यक्रम आखून सदरील अभियान यशस्वी करावं असे आव्हान संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण साहेब यांनी केले. यावेळी माजी आमदार दिनकरराव माने साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा सुशिक्षित बेरोजगारांचे हाल,भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार कसे अकार्यक्षम आहेत. याबद्दल बोलत असताना *दिनकरराव माने साहेब* म्हणाले की दहा वर्षाच्या माझ्या कालखंडामध्ये लाईटची बोंबाबोंब कधी होऊ दिली नाही येणाऱ्या तक्रारीचे निवारण संबंधित समोरच करून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मी काही निर्णय घेतले तसेच माझ्या काळात आमदार निधीचे झालेलं वाटप हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून मी विरोधकांना आवाहन केलं होतं. दिनकर माने यांचा आमदार निधी मिळाला नाही असं गाव कळवा आणि एक लाख रुपये मिळवा परंतु एकही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. कारण मी केलेलं नियोजन प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाला आपलं मानून घेतलेले निर्णय होते. त्या काळात पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना एम एस ई बी, तहसील, पंचायत समिती, आरोग्य खातं या सगळ्यावर आमदाराचा अंकुश असला पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करून लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम केलं आज आत्ताच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपण सर्वसामान्य माणसाचं देणं लागतो 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण या भावनेतून कामाला लागावं शिवसेना आता जोमाने उभे टाकलेली आहे. पक्षप्रमुखांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या जनतेत खूप मोठा आदर निर्माण झालेला आहे. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये *पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब* यांच्या नेतृत्वामध्येच घवघवीत यश मिळणार असून सर्वसामान्य माणसाला सत्तेत बसवण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपरिषद असतील नगरपंचायत असेल यामध्ये शिवसैनिक सत्तेत बसले पाहिजेत अशा पद्धतीचे नियोजन पदाधिकाऱ्यांनी करावं असे आव्हान दिनकरराव माने साहेब यांनी केले. या शिबिराचं आयोजन कशासाठी केलं होतं हे प्रशिक्षण कशासाठी देण्यात आलेला आहे याबाबतीत बोलत असताना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की *होऊ द्या चर्चा* गावा गावात करीत असताना *शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब* या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोरोना सारख्या महाभयंकर अशा परिस्थितीला सामोरे जाऊन एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आपलं कुटुंब समजून कोरोना मुंबईतून महाराष्ट्रातून हद्दपार करून ऑक्सिजन विना औषधाविना एकही व्यक्ती मृत्यू पावला नाही किंवा या महाभयंकर अशा परिस्थितीमध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचे प्रत नदीत कुठे वाहून जाऊ दिलं नाही असं काटेकोर नियोजन करून शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे टाकणारे नेतृत्व ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा खरा फायदा *शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ केलं कसल्याही प्रकारचा गाजावाजा नाही मी पण नाही मी केले असं नाही मी निश्चित स्वरूपांना या महाराष्ट्राचे देणे लागतो याच भावनेतून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले जे निर्णय होते ते निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेला आवडत असल्यामुळे *शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब* महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात बसले आणि त्याच पद्धतीचा अहवाल आवाज सर्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशात गाजत असताना *शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची* लोकप्रियता वाढत असलेली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागली आणि गद्दार एकनाथ शिंदे सारखा माणूस भाजपाच्या गळाला लागला आणि चाळीस गद्दारांनी विश्वासघात करून पक्ष सोडून निघून गेले त्यामुळे व्यतिरिक्त झालेले *उद्धव साहेब* यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला हा भारतीय जनता पार्टी मिळते गटाचा घाणेरडा डाव या महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाहीये म्हणूनच *पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब* यांच्या पाठीमागे अत्यंत मोठ्या संख्येने लोक येत आहेत पाठिंबा देत आहेत जातीपातीच्या भिंती तोडून पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात सरकार आणायचा जनतेने उचललेला आहे. आणि निश्चितच 40 गद्दार निघून गेले असतील तर 140 निष्ठावान निवडून येतील अशी आजची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. यासाठी *होऊ द्या चर्चा* हे अभियान लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीत तांड्यावर होऊन भारतीय जनता पार्टीचा खोटा मुखवटा टराटरा फाडून मिंदे गद्दार गटाची खरी लायकी काय हे जनतेसमोर दाखवून देऊन *उद्धव साहेब* यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा व 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान चा कार्यक्रम यशस्वी पार पडावा झालेल्या नियोजनाप्रमाणे शंभर टक्के कार्यक्रम झालेच पाहिजेत व त्यांनी प्रभावीपणे आपले मुद्दे मांडून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कसा आहे हे लोकांना पटवून सांगावे शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून घ्यावा तसेच *पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी* शेतकऱ्यांसाठी धीर देण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आपल्या सोबत आहोत हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करावा अशा पद्धतीचे नियोजन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी काढले. यावेळी शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक विनोदा आर्य उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, बजरंग जाधव तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, अविनाश रेशमे ,बाबुराव शेळके ,भागवत वंगे ,मुकेश सुडे व लातूर शहरातील शहर प्रमुख सुनील बसपुरे, रमेश माळी यांनी उद्या चर्चेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा सादर केला. यावेळी बँक कर्मचारी सेनेचे जिल्हाप्रमुख सीके मुरळीकर एस आर चव्हाण
महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुनिता ताई चाळक युवती सेना जिल्हाधिकारी एडवोकेट श्रद्धा जवळगेकर कामगार सेना महिला संघटिका प्रीती ताई कोळी सौ पांढरे ताई माने ताई वाघमारे ताई अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष सलीम पटेल श्री प्रवीण सूर्यवंशी लातूर महानगरप्रमुख विष्णू साठे महानगर संघटक बालाजी जाधव शहर प्रमुख रमेश माळी शहर प्रमुख सुनील बसपुरे दत्ता भोसले सर्व नियुक्त केलेले वक्ते नियोजन करते शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे यांनी केले हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी औसा विधानसभा समन्वयक संतोष सूर्यवंशी महादेव साळुंखे उपतालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी सहदेव कोळपे आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *