• Mon. Apr 29th, 2024

दिव्यांग – अव्यंग विवाहीत जोडप्यांना धनादेश वितरण

Byjantaadmin

Jan 10, 2024

दिव्यांग – अव्यंग विवाहीत जोडप्यांना धनादेश वितरण

लातूर, दि. 10 (जिमाका) :  अव्यंग व्यक्तींनी दिव्यांग व्यक्तीं सोबत विवाह केल्यास अशा विवाहीतांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत प्रोत्साहनपर 50 हजार  रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेअतर्गत सन 2023-24 मध्ये एकूण 16 जोडप्यांची निवड करुन लाभ देण्यात आला. या अनुषंगाने निवड झालेल्या जोडप्यांना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्यप्र शासन नितीन दाताळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते 10 जानेवारी, 2024 रोजी धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, सहाय्यक लेखाधिकारी सुनिल जोशी, कार्यालय अधिक्षक राम वंगाटे, व दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते  विनोद पुदाले यांची उपस्थिती होती.  प्रातिनिधीक स्वरुपात रंणजीत धाकतोडे व  राजनंदिनी सुरवसे,  राहूल पुंडकरे व दिव्या पुंडकरे, तसेच सुशिल घोडके व   प्रमिला घोडके या विवाहीतांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील दिव्यांग अव्यंग विवाहीतांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाकडे विवाह झाल्यापासून एक वर्षाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आहवान जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *