• Fri. May 3rd, 2024

‘कोटपा’कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी औसा येथे 22 जणांकडून दंड वसूल जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाची कारवाई

Byjantaadmin

Nov 29, 2022

‘कोटपा’कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी औसा येथे 22 जणांकडून दंड वसूल जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाची कारवाई

लातूर, दि. 29 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याचे (कोटपा) उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाने औसा येथे 22 जणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत पाच हजार 250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, औसा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने ही कारवाई केली.
औसा येथील बसस्थानक, हनुमान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अवैधरित्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि जाहिराती करणारे पानटप1री चालकधारक, तहसील कार्यालय व परिसरात सार्वजनिक ठिकाणी पान, सुपारी, गुटखा खाणे व थुंकणाऱ्यांवर 22 जणांवर पथकाने कोटपा कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई केली. या पथकामध्ये औसा येथील पोलीस निरीक्षक श्री. पटवारी, श्री. पडिले, श्री. गवळी डॉ. माधुरी उटीकर, प्रकाश बेंबरे, श्रीमती संध्या शेडोळे, अभिजित संगई यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *