• Tue. Apr 30th, 2024

स्टेट बँकेकडून जिल्हा बँकेला मागणीनुसार रोकड पुरवठा होत नसल्याने  रोकडचा तुटवडा

Byjantaadmin

Apr 18, 2024

स्टेट बँकेकडून जिल्हा बँकेला मागणीनुसार रोकड पुरवठा होत नसल्याने  रोकडचा तुटवडा

बँकेचे कार्यकारी संचालक हानमंत जाधव यांची माहिती.

लातूर -लातूर जिल्हा बँकेमार्फत माध्यमिक शिक्षकांचे पगार, शेतकऱ्याची ऊस बिले, निराधार वाटप, पेन्शनर्स पगार, पीएम किसान, अनुदान वाटप, पीकविमा इ. चे वाटप केले जाते. बँकेस रोकड पुरवठा हा चेस्ट करन्सी मार्फत केला जातो. आपल्या जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) इतर बँकांना रोकड पुरवठा करते. जिल्हा बँकेस दैनंदिन व्यवहारासाठी दररोज १५ कोटी रुपये रकमेची आवश्यकता असते. परंतु स्टेट बँकेमार्फत मागणीनुसार रोकड पुरवठा केला जात नाही. जिल्हा बँक इतर बँकांकडून स्वखर्चाने रोकड जमा करते व ग्राहकांच्या गरजा भागविते. 

माहे एप्रिल २४ मध्ये शिक्षकांचे पगार, निराधार, पेन्शनर्स पगार,शेतकऱ्याचे ऊसबिल हे एकाचवेळी जमा झाल्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात रोकड रकमेची मागणी वाढली असुन मागील कांही दिवसापासून दैनिक रोकड मागणी वाढून रु.२५ कोटीवर गेलेली आहे. अचानक रोकड मागणीत झालेली वाढ व स्टेट बँकेकडून होत नसलेला पुरवठा यामुळे कांही प्रमाणात सध्या रोकड टंचाई भासत आहे. एका वृत्तपत्रात जिल्हा बँकेत पैशाचा तुटवडा अशी बातमी प्रकाशित झाली होती  स्टेट बँक करन्सी कडून रोकड पुरवठा कमी होत असल्याने रोकड तुटवडा  निर्माण झाला  आहे 

रोकड पुरवठा बाबत मा. जिल्हाधिकारी यांना जिल्हा बँकेकडून निवेदन

स्टेट बँक चेस्ट करन्सी मार्फत लातूर जिल्हा बँकेस मागणीनुसार रोकड पुरवठा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन/विनंती पत्र जिल्हा बँकेमार्फत मा. जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेले आहे. तसेच जिल्हा बँकेस स्टेट बँकेने मागणीनुसार रोकड पुरवठा अशा आशयाचे पत्र स्टेट बँकेस दिलेले आहे. त्याचबरोबर रिझर्व बँक ऑफ इंडिया, नागपूर यांनाही जिल्हा बँकेस मागणीनुसार रोकड पुरवठा करावा असे निवेदन दिलेले आहे. असे जिल्हा बँकेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *