• Thu. May 2nd, 2024

लातूररात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा विराट ऐतिहासीक सभेत शुभारंभ

Byjantaadmin

Apr 19, 2024

लातूररात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा विराट ऐतिहासीक सभेत शुभारंभ देशात फसवणूक आणि एकअधिकारशहीच्या विरोधात परीवर्तनाची लाट

विलासराजींच्या कार्याला शोभेल असे मताधिक्य दया – बाळासाहेब थोरात

दहा वर्षात निष्क्रीय राहून जनतेची निराशा करणाऱ्यान  सत्ताधाऱ्यांना बदलण्याची आता गरज- माजी मंत्री दिलीपराव देशमुख

सातत्याने फसवणूक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता मतदानातून उत्तर देईल -अमित विलासराव देशमुख

उमेदवारी कोणाला मिळाली हे न पाहता संवीधानाच्या रंक्षणासाठी बदल घडवा –  खासदार चंद्रकांत हंडोरे

मनुस्मृती आणण्याचे मनसुबे उधळण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी शक्ती उभी करा –  सुषमा अंधारे

पन्हा गुलामगीरीत जायचे नसेल तर महाविकास आघाडीला ताकद दया-    सचिन साठे

भाजपने मागील १० वर्षांत लोकांची केवळ निराशा करण्याचं काम केले –    आमदार धीरज विलासराव देशमुख

अहमदपूर मतदारसंघातून आम्ही ६९ हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ लातूर जिल्ह्यात भाजपची अवस्था बिकट आहे,-    माजी मंत्री विनायकराव पाटील

लातूर प्रतिनिधी :

राज्यातील आणि देशातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. सातत्याने होणारी फसवणूक आणि एकाधिकारशाही विरोधात जनतेच्या मनात प्रचंड
राग आहे. त्यामुळे संपूर्ण देशात परीवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. लातूर लोकसभा मतदार संघातील डॉ. शिवाजी काळगे यांच्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या मिरवणूकीला आणि प्रचार शुभारंभ सभेला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद हे त्याचेच धोतक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघातील व महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी शुक्रवारी लातूरात लक्षवेधी विशाल मिरवणूक काढून
आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) मैदानावर त्यांच्या प्रचाराची शुभारंभ सभा झाली. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख पार पडलेल्या या ऐतिहासीक सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. या सभेस काँग्रेस पक्षाचे नेते खासदार चंद्रकात हंडोरे, वैशालीताई विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, साहित्सरत्न अण्णा भाऊ साठे यांचे पणतू सचिन साठे, उमेदवार डॉ.शिवाजी काळगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार रोहीदास चव्हाण, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरे, प्रा.यशपाल भिंगे, लोहा – कंधार आशाताई शामसुंदर
शिंदे यांच्यासह व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.

विलासराजींच्या कार्याला शोभेल असे मताधिक्य दया

या मिरवणूकीला आणि सभेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांचा विजय निश्चीत झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. काळगे यांचा हा विजय आदरणीय विलासराव देशमुख यांनी या परीसरात केलेल्या विकास कार्याला शोभणारा होइल. यादृष्टीने मताधिक्याचा विक्रम करावा असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

दहा वर्षात निष्क्रीय राहून जनतेची निराशा करणाऱ्यान सत्ताधाऱ्यांना बदलण्याची आता गरज-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

दहा वर्षात निष्क्रीय राहून जनतेची निराशा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बदलण्याची आता गरज निर्माण झाली आहे. या बदलाची सुरूवात लातूर पासून करावी असे आवाहन या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केले. सन २०१४ ला दिशाभुल करणारी सत्ताधाऱ्यांनी सन २०१९ मध्ये नवीन आश्वासने देऊन पून्हा एकदा फसवले आता पून्हा जनता फसणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्‍याचाच परिणाम आजच्या सभेला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादातून दिसून आले आहे. साधनसुचीतेच्या गप्पा मारणारे शेतकरी, महिला, युवक या सर्वांचा भ्रमनिरास केला आहे. भृष्टाचाऱ्याला संरक्षण दिले हे आता स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत सत्ताधारी बदलणे हाच पर्याय राहीला आहे. या बदलाची सुरूवात लातूर पासूनव्हायला हवी असेही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी म्हटले आहे. लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. वातावरण चांगले बनले आहे असे समजून कार्यकर्त्यांनी मात्र स्वस्थ बसू नये, प्रत्येक बुथवरून १०० मताचे मताधिक्य मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी काम केल्यास डॉ. शिवाजी काळगे यांचा २ लाखापेक्षा अधिकच्या मतांनी विजय होईल असेही माजी मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

सातत्याने फसवणूक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता मतदानातून उत्तर देईल -अमित विलासराव देशमुख

सत्ताधारी मंडळींनीकडून सातत्यांने जनतेची फसवणूक होत आहे हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेची ही निवडणूक या फसवणूकीला स्पष्ट उत्तर देण्याची नामी संधी आहे. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानातून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवावा असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलतांना केले. या सभेत आमदार अमित देशमुख यांनी अत्यंत उस्फुर्त भाषण केले. मागच्या निवडणूकीत ज्यांना लातूरकरांनी निवडूण दिले त्यांना पाच वर्षात भाषण कसे करावे हेही शिकता आले नाही, लातूरचा एकही प्रश्न संसदेत मांडला नाही, त्यांना पून्हा संधी देणे कदापीही योग्य ठरणार नाही. या लातूरने आजवर आदरणीय भाई उध्दवराव पाटील, आदरणीय केशवराव सोनवणे, आदरणीय शिवराजजी
पाटील चाकूरकर, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या सारखे नेतृत्व राज्यासाठी आणि देशासाठी दिले आहे.  ही परंपरा पुढे चालवण्यासाठी रूग्णसेवाच इश्वर सेवा समजून कार्य करणारे सुशिक्षीत सुसंस्कृत असलेले डॉ. शिवाजी काळगे यांना मोठया मताधिक्यांने विजयी करावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले. काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी या निवडणूकीच्या निमित्ताने ५ न्याय गॅररंटीचे आश्वासन दिेले
आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूकीत जे आश्वासने दिले जातात त्यांची अमंलबाजवणी निश्चीत होते हे आजवर दिसून आहे आहे त्यामूळे या गॅरंटीवर विश्वास ठेऊन जनतेने डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले आहे. डॉ. शिवाजी काळगे यांची नामनिर्देशन मिरवणूक आणि प्रचार शुभारंभ सभा सकी्रय राहून यशस्वी ठरवल्या बददल आघाडीतील सर्व घटक पक्षाचे तसेच जनतेचे त्यांनी आभार मानले.

 

उमेदवारी कोणाला मिळाली हे न पाहता संवीधानाच्या रंक्षणासाठी बदल घडवा-खासदार चंद्रकांत हंडोरे

अबकी बार ४०० पार असा नारा देऊन भाजपा देशाचे संविधान बदलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही आणि ७५ वर्षापासून देशाला प्रगतीपथावर नेणारे राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी जनतेने शक्ती उभी करावी, असे आवाहन खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे. उमेदवारी कोणाला मिळाली यापेक्षा देशाचे संविधान वाचवायचे, देशाची लोकशाही टीकवायची हा विचार करून महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते
यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करावे असेही खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे. आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना मला सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याच्याच कार्यकाळात राज्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनची उभारणी झाली. मागासवर्गीय
विदयार्थ्यासाठी राज्यभरात जिल्हा आणि तालुका पातळीवर हजार विदयार्थी क्षमतेची वसतीगृह उभारली गेली. ही वसतीगृह कोरोना काळात रूग्णांच्या सेवेसाठी उपयोगाला आली. याकामाची जाणीव ठेऊन मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे.

मनुस्मृती आणण्याचे मनसुबे उधळण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी शक्ती उभी करा-सुषमा अंधारे

भृष्टाचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचे मनसुबे उधळण्यासाठी या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना जनतेने निवडूण दयावे असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी या सभेत बोलतांना केले. समतेचा विचार सांगणारा मतात फूट पाडण्यासाठी दिशाभूल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दया असे आवाहनही त्यांनी केले.

पुन्हा गुलामगीरीत जायचे नसेल तर महाविकास आघाडीला ताकद दया-सचिन साठे

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानाचे रंक्षण करून काँग्रेस पक्षाने देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले हे संविधान बदलून मागास जनतेला पून्हा गुलामीत  ढकलण्याचे षंडयंत्र सत्ताधाऱ्याकडून रचले जात आहे, मे षडयंत्र हानून पाडण्यासाठी सुजाण जनतेने लातूर लोकसभा मतदारसंघात डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे असे आवाहन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे पणतू सचिन साठे यांनी यावेळी बोलतांना केले.

भाजपने मागील १० वर्षांत लोकांची केवळ निराशा करण्याचं काम केले- आमदार धीरज विलासराव देशमुख

आमदार धीरज विलासराव देशमुख प्रास्ताविक करताना म्हणाले की, काँग्रेस महाविकास आघाडीची प्रचार शुभारंभाची रॅली विरोधकांना धडकी भरवणारी आहे. आता लोकांनी ठरवलंय एकच फॅक्टर काळगे डॉक्टर, डॉ. काळगे यांना दिल्लीत पाठवायच ठरलेय. ही निवडणूक लोकशाहीची आहे विचाराची निवडणूक आहे. तो लोकशाहीला विचार टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या निवडणूकीत विरोधकांकडे लोकांचे मुद्दे नाहीत. त्यांचे एकच काम आहे. पक्ष आणि पक्षाची माणसे फोडण्याचे काम करीत आहेत. पण जनता जनार्दनला ते फोडो शकत नाहीत. काँग्रेस सोबत राष्ट्रवादी शिवसेना आप शेकाप कम्युनिस्ट आदी पक्ष व संघटना सोबत आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. येणाऱ्या ७ तारखेला डॉ. काळगे यांना विजयी करण्याचे काम ही लोकशक्ती करणार आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपने दिलेले आश्वासनपूर्ण केले नाही. भाजप शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, महिलांना सुरक्षा देणार होते, बेघरांना घर देणार होते, तरुणांना रोजगार देणार होते, महागाई कमी करणार होते, या आश्वासनांना भुलून लोकांनी त्यांनी संधी दिली पण भाजपने मागील १० वर्षांत लोकांची केवळ निराशा करण्याचं काम केले आहे.

अहमदपूर मतदारसंघातून आम्ही ६९ हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ लातूर जिल्ह्यात भाजपची अवस्था बिकट आहे,-माजी मंत्री विनायकराव पाटील

माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, ही निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेतली आहे. आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे निवडून येणार आहेत. या निवडणूकीत अहमदपूर मतदारसंघातून आम्ही ६९ हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ. लातूर जिल्ह्यात भाजपची अवस्था बिकट आहे, विद्यमान भाजप खासदाराने आजी आमदाराला, माजी आमदार केले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  उमेदवार आहे, असे समजून काम करावे, भाजपला जिल्ह्यातील कोणत्याही गावात लोक येऊ देत नाही, त्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्याला पीक विम्याची पैसे मिळू दिले नाहीत, टेंडर काढून जिल्ह्यात भाजप नेते कमिशन खातात, असे सांगून लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन त्यांनी केले.या सभेत प्रा.यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, आशा श्यामसुंदर शिंदे यांनी भाषणे केली.यावेळी  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राज्य संघटक एकनाथ पवार, पप्पू कुलकर्णी, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, अभय साळुंखे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश बावणे, डॉ.अशोक पोद्दार, संतोष देशमुख, विजय देशमुख, अजित माने, हमीद शेख, रवींद्र काळे, अशोक गोविंदपुरकर, विकास कांबळे, रविशंकर जाधव, गणेश एसआर देशमुख, माजी महापौर स्मिता खानापुरे, अमर खानापुरे, यशवंतराव पाटील, मोईज शेख, सपना किसवे, एकनाथ पाटील, लक्ष्मण कांबळे, सुनीता आरळीकर, सिराज जहागीरदार, विष्णूपंत साठे, सादिक सय्यद, राम स्वामी, एडवोकेट श्रद्धा जवळगेकर, प्रताप भोसले,
बेंजामिन दुप्ते, मारुती पांडे, मनीषा कोकणे आदींसह  महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, व्यापारी, व्यावसायिक, महिला, मजूर  हजारोंच्या संख्येने होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश नवगिरे, सचिन सूर्यवंशी, गोविंद केंद्रे यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव
यांनी मानले.

महापुरूषांना अभिवादन

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे उमेदवारी अर्ज दाखल करून मान्यवर नेत्यासह भव्यदीव्य मिरवणुकीने व्यासपीठावर दाखल झाले नंतर या ठिकाणी समतेचा, एकात्मतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यररत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धपुतळयांना अभिवादन केले. व्यासपीठावरील महापुरूषांची मांडणी आणि त्यांना अभिवादन करण्याचा या एकूण सभेचे वैशिष्टये ठरले.

काँग्रेसच्या न्याय गॅरटीचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते श्रीफळ वाढवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

काँग्रेस पक्षाने या निवडणूकीत देशातील जनतेला पाच न्यायाची गॅरटी दिली आहे. या पाच न्यायाची गॅरटीचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या शेतकरी तुळशीराम भोसले, सुशिक्षीत युवक कृष्णा कदम, गरीब कुटूंबातील महीला उषा राठोड, मजूर सयानंद गायकवाड आणि मागास समाजातील व्यक्ती धनराज कांबळे यांच्या हस्ते आज व्यासपीठावर श्रीफळ वाढवून डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

व्यक्तीच्या हस्ते श्रीफळ वाढवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन समतेच्या विचाराने एकत्रित आलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचार शुभारंभ सभेच्या व्यासपीठावरील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना भव्य अशा पुष्पहाराने एकत्रित गुफण्यात आले. महाविकास आघाडीतील आम्ही सर्वजण एक आहोत जिददीने लढणार आहोत हे सांगणारे चित्र प्रचार यंत्रणेतील कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारे होते.

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून डॉ. शिवाजी काळगे यांना संवीधान भेट

या प्रचार शुभारंभ सभा प्रसंगी प्रारंभी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना संवीधान भेट देण्यात आली.

व्यासपीठावर जल्लोषात स्वागत

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे उमेदवारी अर्ज दाखल करून भव्यदीव्य मिरवणुकीने व्यासपीठावर दाखल झाले तेव्हा उपस्थित
जनसमुदायाने त्यांचे जोरदार आणि उत्स्फुर्त स्वागत केले. यावेळी काँग्रेस पक्ष आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, डॉ. शिवाजी काळगे व विविध
नेत्यांच्या विजयाच्या घोषणानी परीसर दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *