• Fri. May 3rd, 2024

अमित शहा आणि त्यांच्या पत्नीने कोणत्या 10 शेअर्समध्ये केलीये 1 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक?

Byjantaadmin

Apr 22, 2024

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत १५ एप्रिल २०२४ रोजी ३७.४ कोटी इतकी आहे. अमित शहांनी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

अमित शहा आणि त्यांच्या पत्नीने ५७ टक्के संपत्ती ही शेअर मार्केटमध्ये गुंतवलेली आहे. याशिवाय त्यांची संपत्ती बँक खाते, म्युचल फंड, सोने आणि इतर काही योजनांमध्ये गुंतवण्यात आली आहे. तसं पाहिलं तर शहा यांच्याकडून २४२ शेअर मार्केट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. पण, दहा कंपन्यांमध्ये १ कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या दहा कंपन्यांमधील एकूण गुंतवणूक ४३ टक्के आहे.

शहा यांच्याकडून बँकिंग आणि FMCG शेअर्समध्ये जास्त रस दाखवण्यात आला आहे. कँनरा बँक (२.९६ कोटी) आणि करुर व्यास्या बँक लिमिटेड (१.८९ कोटी) रुपये म्हणजे १३ टक्के गुंतवणूक या दोन बँकांच्या शेअर्समध्ये करण्यात आली आहे. याशिवाय काही प्रमाणात बंधन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील गुंतवणूक करण्यात आली आहे.

अमित शहा आणि सोनल शहा यांनी १ कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केलेल्या दहा कंपन्या

कॅनरा बँक – २.९६ कोटी (सोनल शहा २.९६ कोटी)

प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअर लिमिटेड- १.९ कोटी (०.९५ कोटी)

करुर व्यास्या बँक लिमिटेड– १.८९ (१.८९ कोटी)

गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड– १.७९ कोटी (१.७९ कोटी)

लक्ष्मी मशिन वर्क्स लिमिटेड– १.७५ कोटी (१.७५ कोटी)

हिंदूस्तान युनिलिव्हर- १.३५ कोटी

एमआरएफ लिमिटेड- १.२९ कोटी

भारती एअरटेल लिमिटेड- १.२२ कोटी (१.२२ कोटी)

कोलगेट-पालमोलिव्ह- १.०७

सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड – १.०५ (१.०५ कोटी)

प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थकेअर लिमिटेडमध्ये १.९ कोटी, हिंदूस्तान युनिलिव्हरमध्ये १.३५ कोटी आणि कोलगेट-पालमोलिव्ह मध्ये १.१० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडमध्ये १.७९ कोटी, लक्ष्मी मशिन वर्क्स लिमिटेडमध्ये १.७५ कोटी, एमआरएफ लिमिटेडमध्ये १.२९ कोटी, भारती एअरटेल लिमिटेडमध्ये १.२२ कोटी आणि सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये १.०५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

एकंदरीत पाहता amit shah आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी ६५.७ कोटी रुपयांची संपती आहे. २०१९ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ४०.३ कोटी रुपये होती. त्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये ६३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या जंगम संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये ८२ तर स्थावर संपत्तीमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *