• Mon. May 6th, 2024

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटना शाखेचे उद्घाटन संपन्न

Byjantaadmin

Dec 1, 2022

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटना शाखेचे उद्घाटन संपन्न

कासार बालकुंदा (प्रतिनिधी )
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटना या शाखेचे उद्घाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले. कार्यक्रमाला गावातील सर्वधर्मीय बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. फलकाचे अनावरन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांनी मार्गदर्शन केले. टिपू सुलतान यांनी भारत देशासाठी योगदान दिले आहेत. मोठ्या व्यक्तींना समाजात न बांधता विचार सर्वांनी आचरणात आणावे व या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक लोक हिताचे कार्यक्रम उपक्रम राबविण्यात यावे .असे मत जिल्हाध्यक्ष मुजिब सौदागर यांनी व्यक्त केले.
त्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजीत कोकणे , जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर तालुका अध्यक्ष सबदर कादरी,निलंगा शहराध्यक्ष बाबा बिबराळे, वैभव नायब, राम सूर्यवंशी, भालचंद्र मुळजे, बंडाप्पा मेंडोले, शाखा अध्यक्ष ,सरफराज़ पटेल उपाध्यक्ष, अज़ीम धानुरे सचिव, बबलू चौधरि सहसचिव ,अज़हर शेख, फरुक फकीरावाले, अहमद चिदरे, राहेमान् भाई , अहेमद् पटेल,सादिक बड़ूरे, मौला शेख,चांद चौधरी,तय्यब् सय्यद्,अज़ीम फकीरावाले,अरबाज़ चौधरीसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नयुम पटेल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *