• Mon. May 6th, 2024

गुजरात निवडणुक; पहिल्या टप्प्यात 57% मतदानाचा अंदाज:सौराष्ट्र-कच्छमध्ये फक्त 42% मतदान, टक्केवारी घटली; उमेदवार संभ्रमात

Byjantaadmin

Dec 1, 2022

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सायंकाळी 5 वाजता पूर्ण झाले. मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली. दुपारी 12 नंतर काही प्रमाणात मतदानात वाढ झाली. परंतु, अंदाजानुसार मतदानाची टक्केवारी कमीच राहिली. सायंकाळी 5 वाजता मतदान केंद्रे बंद झाली, मात्र कॅम्पसमध्ये मतदारांचे मतदान सुरूच होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले आहे.

दक्षिण गुजरातच्या तुलनेत सौराष्ट्रात 14% कमी मतदान

सौराष्ट्र-कच्छमध्ये केवळ 42 टक्के मतदान झाले. त्याचवेळी दक्षिण गुजरातमध्ये 56 टक्के मतदान झाले आहे. अशाप्रकारे दक्षिण गुजरातच्या तुलनेत सौराष्ट्रात 14 टक्के कमी मतदान झाले आहे. येथील 12 जिल्ह्यांपैकी केवळ मोरबीमध्ये 53.75% मतदान झाले. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 50% पेक्षा कमी मतदान झाले आहे. त्यामुळे पाटीदार मतदारसंघात कमी मतदान झाल्याने उमेदवार चिंतेत पडले आहेत.

788 उमेदवार रिंगणात
राज्यातील 19 जिल्ह्यांतील या जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात 2 कोटींहून अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यातील एकूण 89 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 58, काँग्रेसकडे 26 आणि बीटीपीकडे 2, राष्ट्रवादीला एक जागा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *