• Fri. May 3rd, 2024

श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही-जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी

Byjantaadmin

Sep 22, 2022

श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही-जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी
विरशैव लिंगायत समाजाच्या धर्मसभेत प्रतिपादन; माजी मंत्री आ. निलंगेकरांची उपस्थिती

लातूर/प्रतिनिधी ः- आपल्या कार्याप्रती श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतेही कार्य तडीस जाणे अशक्य नसल्याचे सांगत श्रद्धा आणि भक्ती असेल तर कार्य अवघड जात नाही असे प्रतिपादन काशी पिठाचे नुतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. लातूर येथील विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने काशिपिठाचे नुतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा गौरव सोहळा येथील दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी धर्मसभेत जगद्गुरु यांनी आपल्या आर्शिवचनात सांगितले.
काशिपिठाच्या जगद्गुरु गादीवर डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांना विराजमान केल्याबद्दल त्यांचा गौरवसोहळा लातूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, डॉ. शांतीविरलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासह विविध पिठाच्या शिवाचार्यांचीही उपस्थिती होती. या धर्मसभेला माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनीही उपस्थिती लावत जगद्गुरुंचे आर्शिवाद घेतले.
जगात आई-वडीलांसह गुरुपेक्षा कोणीच श्रेष्ठ नसल्याचे सांगत जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी आई-वडीलांची भक्तीभावाने आणि निष्ठेने सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगितले. निष्ठा आणि भक्ती याचा संगम झाल्यास कोणतीही कार्य कठीण नसते. मात्र यासाठी प्रत्येकाने भक्तीभाव आपल्या मनात ठेऊन आपल्या कार्याप्रती निष्ठा ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. निष्ठा आणि भक्तीतून झालेले कार्य लोकसेवेच्या हिताचे ठरते आणि त्यामुळे लोकांचे कल्याणही होते असे स्पष्ट केले.
याप्रसंगी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी लातूर हे शिक्षणाबरोबरच अध्यात्माचे माहेरघर म्हणून आता ओळखले जाऊ लागले असून, अध्यात्मिक क्षेत्रातही लातूर पॅटर्न निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या गौरवसोहळ्याचे औचित्य साधत आयोजित केलेल्या धर्मसभेला आणि जगद्गुरुंच्या आर्शिवचनाला माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती. यावेळी आ. निलंगेकरांनी जगद्गुरुंचे दर्शन घेऊन त्यांचा आर्शिवाद घेतला. याप्रसंगी प्रदेश मिडियाच्या पॅनलिस्ट प्रेरणा होनराव, पुष्कराज खुब्बा, अ‍ॅड. उमाशंकर पाटील, सतिष खेकडे, विरभद्र स्वामी, शरणप्पा अंबुलगे यांच्यासह जिल्ह्यातील समाजबांधव आणि भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *