• Fri. May 3rd, 2024

नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित; मुंबईतील शिवडी न्यायालयाचा दणका

Byjantaadmin

Jan 30, 2023

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंबईतील शिवडी न्यायालयाने नवनीत राणांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केलं आहे. तसेच, न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

नवनीत राणांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेली जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा, नवनीत राणांच्या वडिलांच्या पुकारा करण्यात आला. पण, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. तसेच, ते न्यायालयात हजरही झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं. आता हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या निवासस्थानी न्यायालयाची नोटीस लावण्यात येणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यात फेरफार करुन अनुसूचित जाती ( एससी ) चे प्रमाणपत्र अवैधरित्या मिळवला. आणि ते प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यात आलं. याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात नवनीत राणांसह त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेसही आरोपी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *