• Fri. May 3rd, 2024

“भारत जोडो यात्रा” सांगता समारंभ पार्श्वभूमीवर लातूरच्या कॉंग्रेस भवन येथे ध्वजारोहण

Byjantaadmin

Jan 31, 2023

“भारत जोडो यात्रा” सांगता समारंभ पार्श्वभूमीवर लातूरच्या कॉंग्रेस भवन येथे ध्वजारोहण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

लातूर (प्रतिनिधी):-अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेच्या सांगता समारंभ पार्श्वभूमीवर लातूरच्या कॉंग्रेस भवन याठिकाणी सोमवारी लातूर शहर व जिल्हा कॉंग्रेस च्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत विनम्र अभिवादन देखील करण्यात आले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला एकत्रित करून, केंद्र सरकारच्या “भिती, धर्मांधता आणि पूर्वग्रह” या मार्गाने चालवलेल्या राजकारणाविरुद्ध आणि उपजीविकेचा नाश, वाढती बेरोजगारी आणि वाढत्या असमानतेच्या विरोधात तसेच विभाजनाच्या राजकारणा विरोधात जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत ३,५७० किलोमीटर अंतरावर पायी जाण्याची “भारत जोडो यात्रा” ही ऐतिहासिक यात्रा केली.

या यात्रेचा जम्मू काश्मीर येथे सांगता समारंभ होत आहे, त्या निमित्त संपूर्ण देशातील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज सोमवार दिनांक ३० जानेवारी रोजी काँग्रेस भवन, लातूर या ठिकाणी लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस देखील पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी चे लातूर शहर सहनिरीक्षक फरिदभाई शेख यांनी “हाथ से हाथ जोडो” अभियान यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना केले.   यावेळी लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव, अभय साळुंके, सौ.स्मिताताई खानापुरे, सौ.सपनाताई किसवे, ॲड.प्रमोद जाधव, विजयकुमार साबदे, चंद्रकांत धायगुडे, ॲड.देविदास बोरूळे पाटील, ॲड.फारूक शेख, एकनाथ पाटील, रमेश सूर्यवंशी, इम्रान सय्यद, ॲड.शरद देशमुख, महेश काळे, सौ.स्वातीताई जाधव, मुकेश राजमाने, सिकंदर पटेल, आसिफ बागवान, प्रा.प्रवीण कांबळे, जालिंदर बरडे, ज्ञानेश्वर सागावे, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, ॲड.सुनीत खंडागळे, ॲड.अंगदराव गायकवाड, बाप्पा मार्डीकर, प्रा.सुधीर आणवले, बिभीषण सांगवीकर, प्रा.एम.पी.देशमुख, रत्नदीप अजनीकर, आकाश भगत, विकास कांबळे, कमलताई मिटकरी, शीतल मोरे, सुलेखाताई कारेपूरकर, करीम तांबोळी, निजाम शेख, खाजाभाई शेख, गिरीश ब्याळे, भाऊसाहेब भडिकर, संजय पाटील, पवनकुमार गायकवाड, कुणाल वागज, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, विष्णुदास धायगुडे, ॲड.प्रसाद ढगे, अक्षय मुरळे, धनंजय गायकवाड, अमोल गायकवाड, आबु मणियार, विजय टाकेकर, फैसलखान कायमखानी, किरण बनसोडे, बब्रुवान गायकवाड, प्रमोद जोशी, संदीपान सूर्यवंशी, दयानंद बिडवे, मेनोद्दीन शेख, इलाही तांबोळी, रोहित वडुरले, पंकज देशमुख, आकाश मगर, सुमित भडिकर, कैलास माने, पिराज साठे, संजय सुरवसे, राजू गवळी, अशोक भंडारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *