• Thu. May 2nd, 2024

सामुदायिक दसरा महोत्सवाच्या दांडिया रासचे खा शृंगारे यांच्या हस्ते उद्घाटन-खासदारांच्या हस्ते नवदुर्गांचा सत्कार

Byjantaadmin

Oct 3, 2022
सामुदायिक दसरा महोत्सवाच्या दांडिया रासचे खा शृंगारे यांच्या हस्ते उद्घाटन-खासदारांच्या हस्ते नवदुर्गांचा सत्कार
लातूर,. (प्रतिनिधी )परंपरागत प्रथांचा अलीकडच्या काळात रास होत चालल्याने सामूहिक दसरा महोत्सवाचे महत्व अधोरेखित होत असून पुढील वर्षी अत्यंत भव्य स्वरूपात दसरा महोत्सव साजरा होईल अशी घोषणा लातूरचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी शृंगारे यांनी रविवारी येथे केली.
सुवर्ण महोत्सवी सामुदायिक दसरा महोत्सव समिती व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने प्रणवश्री मंगल कार्यालयात आयोजित दांडिया रास कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते आमदार रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थित झाले. प्रसंगी खा. शृंगारे बोलत होते. अध्यक्षस्थानी दसरा महोत्सव समितीचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे होते. व्यासपीठावर आमदार रमेशअप्पा कराड, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष ईश्वर बाहेती, ग्रामीण अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर, मुख्य संयोजक श्रीकांत रांजनकर, सरचिटणीस व्यंकटेश हलिंगे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव प्रा विनोद चव्हाण, डॉ हनुमंत कोळेकर, विक्रम शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी लातूर शहरातील कर्तृत्ववान  सुलोचना अंकुशे,  रागिणी यादव, डॉ अश्विनी बेडगे, ॲड. तेजस्विनी जाधव, सौ छाया चिंदे, जयश्रीताई तांदळे, सुजाता कसपटे, सुनंदाताई जगताप, साक्षी भातलवंडे अशा नवदुर्गांचा सत्कारही खासदार सुधाकर शृंगारे आणि आमदार रमेश अप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आला.
सुवर्ण महोत्सवी सामुदायिक दसरा महोत्सव समिती व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने प्रणवश्री मंगल कार्यालयात आयोजित दांडिया रास कार्यक्रमात परंपरागत वेशभूषेत शहरातील दोनशे पेक्षा अधिक तरुण तरुणींनी सहभागी होऊन कार्यक्रम उंचीवर नेला. विशेष म्हणजे महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत खासदार शृंगारे व आमदार कराड यांनी दांडिया खेळून आनंद लुटला. सुप्रसिद्ध गायक तथा निवेदक छोटू हिबारे यांनी बहारदार मराठी व हिंदी गीतांच्या गायनातून उपस्थितांची मने जिंकली
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप कानगुले यांनी केले तर यशस्वितेसठी समितीचे संयोजक नितीन मोहनाळे, समिती संघटक अमोल नानजकर, ॲड राणी स्वामी, दांडिया समिती प्रमुख स्वाती गंगवार, संदीप पुणेकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *