• Mon. May 6th, 2024

अहमदपूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे कर आकारणीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन

Byjantaadmin

May 6, 2023

अहमदपूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे कर आकारणीसाठी  ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम होणार : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

 

  • जाहिरातीच्या बॅनरवरील परवानगीबाबत क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन तपासणी
  • जिल्ह्यातील सर्व नगर परिषद / नगर पंचायतींनी क्यूआर कोड अमलबजावणीबाबत

गांभिर्याने लक्ष देण्याच्या सूचना

 

लातूर,(जिमाका)- अहमदपूर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तेचे मालमत्ता कर आकारणीसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांना देण्यात आले आहे.सदर काम संस्थेमार्फत आज दि. ५ मे, २०२३ रोजी महात्मा गांधी महाविद्यालय मैदानावरून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरवात करण्यात आले.

यावेळी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी , मुख्याधिकारी तथा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, अजय नरळे मुख्याधिकारी चाकूर, कार्यालय अधीक्षक सतीश बिलापटे अभियंता काजी सल्लाऔदिन, गणेश पुरी, स्वरूप चिरके, कर निरीक्षक सुहास गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी पुजारी, टोगळे, शैखमहमद, सय्यद पाशा, विनोद ढवळे, लिपिक गौतम लामतुरे, शैख मुसा व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांच्या श्रीमती. प्रिया व त्यांची टीम उपस्थित होती.

यावेळी नगर परिषदेमार्फत जिल्हाधिकारी यांचा प्रशासक प्रविण फुलारी यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याधिकारी प्रसादजी कुलकर्णी यांच्या हस्ते न. पा. प्र. सहआयुक्त रामदासजी कोकरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

उद्घाटनाच्यावेळी ड्रोन सर्वेक्षण मालमत्ता संगणकीकरण बाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सविस्तर माहिती घेवून व काम जलदगतीने व बिनचूक पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सदर कामाचा प्रत्येक जिल्हा आढावा बैठीकीमध्ये आढावा घेण्यासाठी सह आयुक्त यांना सूचना केली. उद्घाटनानंतर नगर परिषदेतर्फे सतीश बिलापटे यांनी आभार मांडले.

सर्वेक्षणाचे उद्घाटन झाल्या नंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी नांदेड लातूर रोडवर लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या बॅनरवरील परवानगीबाबत क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून तपासणी केली न. प. कर्मचारी विशाल ससाणे यांनी क्यूआर कोड स्कॅन करून दाखवला.  जिल्ह्यातील सर्व नगर परिषद / नगर पंचायतींनी क्यूआर कोड अमलबजावणीबाबत गांभिर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *