• Fri. May 3rd, 2024

जय जवान जय कीसान साखर कारखाना चालू करण्यासाठी विठठल साई सहकारी साखर कारखान्यास टवेन्टिवन शुगर व्यवस्थापनाची नाहरकत

Byjantaadmin

May 25, 2023

लातूरच्या सुसंस्कृत राजकारणातून सहकार क्षेत्राला उभारी जय जवान जय कीसान साखर कारखाना चालू करण्यासाठी विठठल साई सहकारी साखर कारखान्यास टवेन्टिवन शुगर व्यवस्थापनाची नाहरकत

लातूर प्रतिनिधी : गुरूवार २५ मे २०२३ लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जोपासत आदरणीय नेत्यांच्या शब्दाचा सन्मान राखत टवेन्टिवन शुगर व्यवस्थापनाने चार पावले मागे घेत जय जवान जय कीसान साखर कारखाना विठठल साई सहकारी साखर कारखान्या मार्फत चालू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे हा
कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जय जवान जय कीसान साखर कारखाना चालवण्यास देण्यासाठी राज्य शिखर बॅकेने काढलेल्या निवीदेसाठी टवेन्टिवन शुगर हा कारखाना पात्र ठरलेला असतांना राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार हा कारखाना चालू करण्यासाठी खाजगी ऐवजी सहकारी साखर कारखान्यालाच प्राधान्य दयावे म्हणून विठठल साई साखर कारखान्याने उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचीकेवर निकाल देतांना कारखाना कोणाला चालवण्यास देण्या संदर्भात राज्य शिखर बँकेनेच निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता. या निकालानुसार टवेन्टिवन शुगरने नाहरकत प्रमाणपत्र दिल्या शिवाय विठठल साईकडे कारखाना सुपूर्द करणे शक्य  नव्हते. जय जवान साखर कारखानाचे संस्थापक आदरणीय नेते माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या सूचनेचा सन्मान राखत, आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर यांचा आग्रह लक्षात घेता टवेन्टिवन शुगर व्यवस्थापनाने जय जवान जय कीसान साखर कारखाना विठठल साई सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वेंटीवन शुगरच्या वतीने हे नाहरकत प्रमाणपत्र लवकरच राज्य शिखर बँकेत सादर केले जाईल. त्यानंतर राज्य शिखर बँक नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करेल. या संदर्भाने मंगळवार दि. २३ मे रोजी सांयकाळी बाभळगाव येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच प्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली बैठकीस प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे विलास बँकेचे उपाध्यक्ष ॲड समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे आदीजण उपस्थित होते, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विठठल साई साखर कारखान्या मार्फत जय जवान जय कीसान साखर कारखाना चालवण्यासाठी शैलेश पाटील चाकूरकर यांना शुभेच्छा दिल्या तर Nप्रदेश सरचिटणीस शैलेश पाटील चाकूरकर यांनीही आमदार अमित देशमुख व ट्वेंटीवन शुगर व्यवस्थापनाचे यावेळी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *