• Sun. May 5th, 2024

शिंदे गटात प्रवेश करताच मनीषा कायंदे यांच्यावर मोठी जबाबदारी, खुद्द एकनाथ शिंदेंनी केली घोषणा!

Byjantaadmin

Jun 19, 2023

शिवसेना पक्षाचा सध्या संघर्षाचा काळ सुरू आहे. साधारण एक वर्भभरापूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत.

Manisha Kaynde

विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनीषा कायंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. दरम्यान, रविवारी मनीषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. कायंदे यांची shivsena सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनीषा कायंदे यांच्यासह चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांच्या पत्नीनेदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

आमदार कायंदे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटवरून शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मनीषा कायंदे या उद्धव thakre गटाच्या आमदार यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनीषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनीषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *