• Tue. May 7th, 2024

 माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 21 जून रोजी 2023 विविध विकास कामाचा शुंभारंभ

Byjantaadmin

Jun 19, 2023

माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 21 जून रोजी 2023 विविध विकास कामाचा शुंभारंभ

लातूर :-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शाखेच्यावतीने भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 21 जून 2023 रोजी मजगे नगर परिसरामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ व राजधानी किल्‍ले रायगड दर्शन मोहिम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 21 जून 2023 रोजी दूपारी 4.30 वा. 100 लक्ष रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये नाली, रस्ते आदी कामांसह विविध विकास कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. याबरोबरच ऐतिहासिक राजधानी किल्‍ले रायगड या रायगडची माहिती तरूणांईंना व्हावी या दृष्टिकोनातून राजधानी किल्‍ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन 21 जून 2023 रोजी दूपारी 4.30 वाजता. करण्यात आलेले असून त्याच दिवशी ही मोहिम किल्‍ले रायगडकडे रवाना होणार आहे.
यावेळी या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *