• Thu. May 9th, 2024

अनसरवाडा ऑरगॅनिक फार्मर प्रोडूसर कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Byjantaadmin

Jun 30, 2023
अनसरवाडा ऑरगॅनिक फार्मर प्रोडूसर कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप
अनसरवाडा;-  अनसरवाडा ऑरगॅनिक फार्मर प्रोडूसर कंपनी च्या सभासदांना सोयाबीन 726 बियाण्याचे वाटप करण्यात आले. सदर बियाणे कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेमधून प्रात्यक्षिक या बाबी खाली सोयाबीन 726 बियाण्याचे सभा सभासदांना वाटप करण्यात आले.
सदरील बियाणे वाटप करते वेळी आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक करमचंद राठोड व साहेब तंत्र व्यवस्थापक तुकाराम सुगावे उपस्थित होते.
सदरील प्रतीक्षकाची बियाणे वाटप करतेवेळी  शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासावे आणि बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणी करते वेळेस 726 हे वाहन एकरी 26 किलो याप्रमाणे पेरणी करावी. आणि त्याबरोबरच गोगलगायचे नियंत्रण करणेसाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या बांधापासून एक ते दोन फुटाच्या अंतरावर चुन्याचा पाच सेंटीमीटर मीटरचा पट्टा ओढावा जेणेकरून त्या गोगलगायी चुन्याची बुट्टी चाटल्यामुळे मरण पावतील. पेरणी झाल्यानंतर स्नेल किल हे रासायनिक औषध एकरी दोन किलो याप्रमाणे त्या खडूचे गोळी स्वरूपात करून एकेक गोळी पाच ते सात फुटाच्या अंतरावर जमिनीमध्ये टाकावे यामुळे सुद्धा गोगलगायचे नियंत्रण होते. आणखीन दुसरी पद्धत म्हणजे शेतकऱ्यांनी  गोणपाटाचे  10 तुकडे करून एकरी दहा ठिकाणी गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून दहा ठिकाणी ठेवावे आणि ते गुण पाठ सायंकाळी  सूर्यास्ता अगोदर आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी पोरगी उचलून त्याखालील जमा झालेल्या गोगलगाय गोळा करून साबणाच्या पाण्यामध्ये भिजवून  नष्ट करावे. असे कृषी विभाग व आत्मा यंत्रणा यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *