• Thu. May 9th, 2024

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Byjantaadmin

Jul 31, 2023

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

लातूर (जिमाका) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. मात्र आता ही मुदत 3 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात आली असून अद्यापही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतकऱ्यांनी या कालावधीत आपल्या पिकांचा विमा उतरविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी, खंडित वीज पुरवता, खंडित इंटरनेट सेवा, तसेच पीएमएफबीवाय पोर्टलवरील तसेच इतर तांत्रिक व्यत्ययामुळे शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होताना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 3 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती शिंदे यांनी केले आहे. तसेच केंद्र शासनाने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ दिल्याने भविष्यात शेतकऱ्यांच्या नोंदणीबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. तसेच वाढीव कालावधीत नोंदणीमध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता संबंधित विमा कंपनीने घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *