• Thu. May 9th, 2024

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात भव्य मोटरसायकल रॅली

Byjantaadmin

Jul 31, 2023
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात भव्य मोटरसायकल रॅली
लातूर-महामानव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंतीच्या वतीने शहरांमध्ये भव्य मोटार सायकल रॅली आज काढण्यात आली. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली .यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून अभिवादन करून या रॅलीची सुरुवात झाली.ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून  बाबासाहेबांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून संविधान चौक पाण्याची टाकी येथून परत शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक,राजीव गांधी चौक ते बसवेश्वर महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून बाभळगाव चौक येथून विवेकानंद चौकात अभिवादन करत परत शाहू महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊंना अभिवादन केल्यानंतर त्या ठिकाणी सभेत रूपांतर होऊन उपस्थित सर्व मातंग समाज व अण्णाभाऊ प्रेमींना सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष संदेश शिंदे, कार्याध्यक्ष विकास कांबळे, सुनील बसपुरे, अशोक देडे,आनंद  वैरागे आदींनी संबोधित करीत सर्वांचे आभार मानले व मोटर सायकल रॅलीचे विसर्जन करण्यात आले यावेळी अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व शहरातील प्रमुख कार्यकर्ते व
नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *