• Wed. May 8th, 2024

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

Byjantaadmin

Sep 30, 2023

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

▪️ आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनीही वाहिली श्रद्धांजली

लातूर दि. 30 ( जिमाका ) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 30 सप्टेंबर 1993 ला झालेल्या भूकंपात हजारो लोकं मरण पावले. त्या दुःखद घटनेला आज तीस वर्ष पूर्ण झाले, त्यासर्वांप्रती संवेदना व्यक्त करून विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी किल्लारी येथील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्यासह अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण

ज्या ठिकाणी भूकंप झाला ते निर्मनुष्य किल्लारी गाव वन विभागाकडे दिले आहे.वन विभागाने तिथे पूर्वीच नक्षत्र उद्यान उभं केलं आहे. आज उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. हे फुलपाखरू उद्यान एक एकर एवढ्या क्षेत्रावर करण्यात आले आहे. या लोकार्पणावेळी आ. अभिमन्यू पवार, वन विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी श्रीमती तांबे, औसा तहसीलदार भारत सूर्यवंशी, सहायक वन अधिकारी सचिन रामपुरे उपस्थित होते.

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी वाहिली श्रद्धांजली

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 30 सप्टेंबर 1993 रोजी भूकंप झाला होता. त्याला आज तीस वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी किल्लारी येथील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी भागात 6.2 एककाचा भूकंप झाला. लातूर शहरापासून अगदी 40 किमी अंतरावरील हे गाव आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदु किल्लारी गावाजवळच 10 किमी खोल पृथ्वीच्या भूगर्भात होता, त्यामुळे याला किल्लारी भूकंप म्हटलं जातं.
या भूकंपाचा धक्का अनेक गावांना बसला. जवळपास ’53 गावे’ ही भुईसपाट झाली होती. यात मुख्यतः लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका या भूकंपाच्या सपट्यात सापडली होती. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भूकंपग्रस्त भागातील राहिलेले प्रश्नाचा पाठपुरावा करून ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *