• Thu. May 9th, 2024

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या  स्वप्नानातील स्वच्छ भारत उभा रहातोय…

Byjantaadmin

Sep 30, 2023
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या  स्वप्नानातील स्वच्छ भारत उभा रहातोय..

महात्मा गांधींनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवला. स्वातंत्र्यलढ्यात सारा देश भारून टाकण्याची क्षमता असलेले गांधीजींचे विचार होते.स्वच्छता विषय तर ते खूप जागरूक होते.ते म्हणायचे स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडवते.
महात्मा गांधी आणि स्वच्छता…
स्वच्छता!” शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्यामचे मोलाचे काम शाळा करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. “Cleanliness is next to Godliness” या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार मा.पंतप्रधान श्री. मोदीजींनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली.
महात्मा गांधी एका हिंदी पुस्तकात सांगतात की
19 नवम्बर 1944 को महात्मा जी ने सेवाग्राम में हिन्दुस्तानी तालीमी संघ द्वारा आयोजित प्रशिक्षण शिविर में भाग लेने वाले सदस्यों को संबोधित करते हुए कहा था- ‘‘शिक्षा में मन और शरीर की सफाई ही शिक्षा पहला कदम है। आप के आसपास की जगह की सफाई जिस प्रकार झाड़ू और बाल्टी की मदद से होती है, उसी प्रकार मन की शुद्धि प्रार्थना से होती है। इसलिए हम अपने काम की शुरूआत प्रार्थना से करते हैं।’’

उन्होंने अन्य बातों की चर्चा करते हुए आगे कहा- ‘‘यदि शरीर को ईश्वर की सेवा का साधन मानते हुए हम शरीर को पोषण देने के लिए ही भोजन करें, तो इससे हमारे मन और शरीर ही स्वच्छ और स्वस्थ नहीं होंगे, बल्कि हमारी आंतरिक स्वच्छता हमारे चारों ओर के वातावरण में भी झलकेगी। हमें अपने शौचालयों को रसोईघर जैसा स्वच्छ रखना चाहिए।
श्रम आणि बुद्धीच्या दरम्यान निर्माण झालेल्या दरीमुळेच आपण ग्रामीण भागाबद्दल बेपर्वाईने वागत आहोत, वास्तविक हा गुन्हा मानायला हवा. श्रमाची प्रतिष्ठा संपल्यामुळे देशातल्या छोट्या सुंदर गावांचं रूपांतर घाणेरड्या, कचऱ्यांनी वेढलेल्या गावात झाले. आपण देशातल्या कुठल्याही गावात प्रवेश करताना कचऱ्याचे ढिगारे पहायला मिळतात. दुर्गंधी पसरलेली दिसते. काही गावात शिरताना या दुर्गंधीमुळे नाक दाबूनच जावे लागते. स्वातंत्र्यात प्रत्येक गाव स्वावलंबी आणि स्वच्छ झाली पाहिजेत. स्वच्छता ही सर्वात मोठा अविरतपणे चालणारी मोहीम ठरली पाहिजे. स्वच्छता म्हणचे राष्ट्रीय कार्य, असे मानल्यास देशातील सर्व गावे स्वच्छ आणि सुंदर होतील. नद्या आणि जलाशय प्रदूषण मुक्त होतील. कचऱ्याच्या खताचा वापर शेतीसाठी होईल. स्वच्छ गाव हा भारताचा आदर्श असायला हवा” असे

महात्मा गांधी, हरिजन सेवक, 15 फेब्रुवारी 1935 च्या त्यांच्या अग्रलेखात म्हणतात.

स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करायसाठी, देशाच्या विकासाचा आर्थिक कणा असलेला ग्रामीण भाग पूर्णपणे स्वावलंबी व्हायला हवा, असा गांधीजींचा आग्रह होता. ते कृतिशील विचारवंत होते. साऱ्या जगाला आदर्शाची प्रेरणा देणाऱ्या गांधीजींनी दक्षिण आफ्रिका आणि भारतातही श्रमदानाचा नवा अध्याय आपल्या कृतिशील कार्याने इतिहासात नोंदवला आहे. ते स्वत: झाडू घेऊन अस्पृश्यांच्या वसाहतीत जात. रस्ते स्वच्छ करत. स्वच्छतागृहे स्वच्छ करत. स्वच्छतेचे महत्त्व जनतेला पटवून देत. बॅरिस्टर असलेल्या गांधीजींना संपूर्ण भारतच स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावा, असे वाटत होते. त्यासाठीच त्यानी ग्राम स्वराज्यावर आणि ग्रामीण स्वच्छतेवर भर दिला. स्वावलंबनाची, श्रमाची प्रतिष्ठा निर्माण केली
स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले. मैला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. डर्बनमध्ये असताना सहकाऱ्याचा शौचकूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता. राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी निस्सारण आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले. १९०१ मध्ये काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले, की परंपरेने अस्पृश्‍य जातीच्या लोकांकडूनच मैला वाहतूक, स्वच्छतागृह साफसफाई करून घेतली जात आहे. या जातिभेदावर अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छतागृह साफसफाईचे काम स्वतः हाती घेतले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःने केली पाहिजे, यासाठी आग्रह धरला.

– उद्धव फड,
संवादतज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *